vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईकरांसाठी विशेष: खूशखबर! 4721 घरांसाठी निघणार म्हाडा लॉटरी, मुंबईमध्ये घर घेण्याचं अनेकांचं स्वप्न होणार साकार

 मुंबईकरांसाठी विशेष: खूशखबर! 4721 घरांसाठी निघणार म्हाडा लॉटरी, मुंबईमध्ये घर घेण्याचं अनेकांचं स्वप्न होणार साकार…

 

मुंबई प्रतिनिधी

मुंबईकरांसाठी विशेष खुशखबर म्हाडा  घरांची मुंबईतल घरांसाठी लवकरच म्हाडा लॉटरी 2023) निघणार आहे. महत्त्वाचे असे की या वेळी म्हाडा 4721 घरांसाठी सोडत काढणार आहे.

 

मुंबईतल घरांसाठी लवकरच म्हाडा लॉटरी (Mhada Lottery 2023) निघणार आहे. महत्त्वाचे असे की या वेळी म्हाडा 4721 घरांसाठी सोडत काढणार आहे. म्हाडाचे कोकण (Mhada Konkan Lottery) मंडळाद्वारे जाहीर होत असलेल्या या सोडतमध्ये ठाणे, विरार परिसरातील घरांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

म्हाडा कोकण मंडळ 2022 मध्येच सोडत काढणार होते. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे ही सोडत लांबली. परिणामी आता ही सोडत निघणार आहे. या सोडतीचे वैशिष्ट्य असे की, ही सोडत संगणकीय प्रणालीनुसार होणार आहे. म्हाडाने लॉटरीसाठी नुकतीच संगणकीय प्रणाली सुरु केली आहे. ही प्रणाली नवी असली तरी, तांत्रिक दृष्ट्या अधिक सक्षम असल्याचे समजते. त्यामुळे म्हाडा कोकण मंडळातील सोडतीच्या घरांची संख्याही वाढल्याचे समजते. प्राप्त माहितीनुसार 1421 घरांसाठी सोडत निघेल अशी आशा आहे.

 

सांगितले जात आहे की, म्हाडा लॉटरीसाठी सोडत निघण्यासाठी आणखी चार ते पाच दिवस वाट पाहावी लागणार आहे. ठाणे येथील विहंग समूह प्रकल्पातील 20% योजनेतून 256 घरे आणि ठाणे महापालिकेतून मिळालेल्या पंतप्रधान आवास योजनेतील 300 घरे अशी एकूण 556 घरांची भर पडल्याने सोडत प्रक्रिया आणखी काही दिवस लांबण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाली की आगामी चार ते पाच दिवसात म्हणजेच साधारण पुढच्या आठवड्यात ही सोडत निघण्याची शक्यता आहे.

काय आहे संगणकीय प्रणाली?

म्हाडाच्या वेगवेगळ्या मंडळांसाठी वेगवेगळी नोंदणी करावी लागत होती. आता नव्या प्रक्रियेमुळे एकच कायमस्वरुपी नोंदणी करावी लागणार आहे. या नोंदणीद्वारे इतर कोणत्याही मंडळाकडे नोंदणी करता येणार आहे. ज्या व्यक्तीला या सोडतीसाठी अर्ज करायचा आहे, तो व्यक्ती सोडत जाहीर झाल्यानंतर या नोंदणीद्वारे लगेचच अर्ज करु शकतो. येत्या गुरुवार म्हणजेच 5 जानेवारीपासून या नोंदणीला सुरुवात होणार असल्याचे वृत्त लोकसत्ता डॉट कॉमने म्हाडातील वरीष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिले आहे.

I असे हे वृत्त बातमी मुंबई लेटेस्ट ने ही दिलेली आहे

 

संबंधित पोस्ट

शासकीय योजनांचे लाभ व कायदेविषयक साक्षरतेसाठी महाशिबिराचे आयोजन

मुंबईत छठपूजेसाठी विशेष आयोजन, समुद्र किनाऱ्यावरील पूजाविधीसह वाहतुकीसंबंधी पोलिसांकडून विशेष सुचना जारी

vishwatmaklokswamivarta

मुंबई दादर रेल्वे स्थानकावर सापडली संशयास्पद बॅग, बॉम्ब शोधक आणि निकामी पथक घटनास्थळी दाखल

vishwatmaklokswamivarta

देश के निर्माण में, चंद्रपूर मैदान में’ – मा. श्री. सुधीर मुनगंटीवार लक्ष्‍मी म‍ित्‍तल ग्रुपसह 19 सामंजस्‍य करारांवर झाल्‍या स्‍वाक्षरी ‘ॲडव्हान्टेज चंद्रपूर 2024 -इंडस्ट्रियल एक्स्पो अँड बिझनेस कॉन्क्लेव्ह’ चे थाटात उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे जिल्ह्यात सेवा पंधरवडा व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ संपन्न ग्रामस्थांच्या सहभागाने सेवा पंधरवडा व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वीपणे राबवावे-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांची जत तालुक्यास भेट-नामनिर्देशनपत्र प्रक्रियेच्या पूर्वतयारीचा घेतला आढावा…

vishwatmaklokswamivarta