vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

काँग्रेस चे नेते बाळासाहेब थोरात यांनी बंडाची भूमिका घेतली,  संजय राऊतशिवसेना खासदार

काँग्रेस चे नेते बाळासाहेब थोरात यांनी बंडाची भूमिका घेतली,  संजय राऊत

शिवसेना खासदार

 

राजकीय प्रतिनिधी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसमधील दुफळी समोर आली आहे. थोरात यांनी अचानक निर्णय घेतल्याने राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसमधील दुफळी समोर आली आहे. थोरात यांनी अचानक निर्णय घेतल्याने राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडीवर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी थेट प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र, बाळासाहेब थोरात शांत आणि संयमी आहेत. चारित्र्य संपन्न नेते आहेत. त्यांनी बंडाची भूमिका घेतली म्हणजे नक्कीच ते मनातून दुखावले असणार असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या कुटुंबांना मी ओळखतो. त्यांच्या नसानसात काँग्रेस आहे. त्यांनी राजीनामा देणं हा त्यांच्या पक्षांतर्गत वाद आहे. आम्ही भाष्य यासाठी करतो कारण काँग्रेस महाविकास आघाडीतील एक घटक पक्ष आहे. त्यांच्या पक्षात स्थिर स्थावर असावं असं वाटतं. या प्रश्नात काँग्रेस हायकमांड लक्ष घालेल. या वादावर आम्ही बोलणं योग्य नाही, असं संजय राऊत म्हणाले.

पक्ष त्यांची भूमिका जाणून घेईल

संयमी आणि स्वच्छ चारित्र्यांचे थोरात हे नेते आहेत. थोरातांसारख्या नेत्याने बंडाची भूमिका घ्यावी याचा अर्थ नक्कीच ते मनातून दुखावले आहेत. अस्वस्थ आहेत. म्हणून त्यांची भूमिका त्यांचा पक्ष जाणून घेईल. एवढंच बोलू शकतो, असं ते म्हणाले.

 

संबंधित पोस्ट

देवळालीचं मत आहे विकासाला, पाठबळ आहे हक्काच्या घड्याळाला..- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रमुख अजित पवार

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राच्या सत्तेत अजित पवारांच्या एंट्रीनंतर शिंदे गट नाराज असल्याची चर्चा ? मंत्री दीपक केसरकर यांनी केला खुलासा…

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी जाऊन अजित पवार यांनी घेतली सदिच्छा भेट.

vishwatmaklokswamivarta

दलित पँथरचे अध्यक्ष यशवंत नडगम यांचा केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश

vishwatmaklokswamivarta

वंचित बहुजन आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर याच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा,रुग्णालयातून साधला कार्यकर्त्यांना संवाद…

vishwatmaklokswamivarta

वचपा नंतर घेवू, काळजी करु नका”; हल्ल्यात जखमी झालेल्या शिवसैनिकाला उद्धव ठाकरेंचा फोन