vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ठाणे शहरातील कोपरी येथील रेल्वे ओलंडणी पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या हस्ते करण्यात आले

ठाणे शहरातील कोपरी येथील रेल्वे ओलंडणी पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या हस्ते करण्यात आले

 

ठाणे प्रतिनिधी

ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर प्रवाशांची वाहतूक कोंडीपासून सुटका करण्याच्या दृष्टीने मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्यावतीने उभारण्यात आलेल्या ठाणे शहरातील कोपरी येथील रेल्वे ओलंडणी पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या हस्ते करण्यात आले

पुलाचे रुंदीकरण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्यात आले आहे. कोपरी रेल्वे ओलांडणी पुलाच्या कामाचा संपूर्ण खर्च एमएमआरडीएमार्फत करण्यात आला आहे. पुलाच्या रेल्वे मार्गिकांवरील भागाचे काम मध्य रेल्वे मार्फत करण्यात आले असून या भागाच्या बांधकामासाठी प्राधिकरणाकडून रेल्वेला निधी देण्यात आला आहे. या पुलाची लांबी 784 मीटर तर रुंदी 37.04 मीटर इतकी आहे

 

महामार्गावर हा पूल 5+5 मार्गिकांचा आहे तर ठाणे शहरातील कोपरी रेल्वे ओलांडणी पूल हा 2+2 मार्गिकांचा होता. या अरुंद रेल्वे ओलांडणी पुलामुळे सकाळी व संध्याकाळच्या वेळेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत होती. ही समस्या दूर करण्याच्या उद्देशाने प्राधिकरणामार्फत कोपरी रेल्वे ओलांडणी पुलाचे रुंदीकरण व बांधकाम करण्यात आले आहे. 2+2 पथमर्गिकेच्या पुलाचे 4+4 असे अपग्रेड केल्यामुळे मुंबई-ठाणे जिल्ह्याच्या सीमेवरील वाहतूक कोंडी कमी होऊन त्याचा फायदा पूर्व द्रुतगती महामार्गावरील लहान तसेच अवजड वाहनांना होणार आहे.

 

 

संबंधित पोस्ट

सीआयएसएफ’कडून रत्नागिरीत‘वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन–2026’चे आयोजन

vishwatmaklokswamivarta

बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय पटावर महाराष्ट्राचे नाव, दिव्या देशमुख भारताचा अभिमान..! विश्वविजेत्या दिव्या देशमुख यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन

गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत -वनमंत्री गणेश नाईक वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ठाण्यात जनता दरबार संपन्न जनता दरबारामध्ये 200 पेक्षा अधिक निवेदने प्राप्त

मुंबई उपनगरासह-ठाण्यात मुसळधार पाऊस सुरू

भूमि अभिलेखकडील अर्धन्यायिक प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी लोक अदालतीचे 26 सप्टेंबरला आयोजन

vishwatmaklokswamivarta

ग्रामीण रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मेकिंग द डिफरन्स एनजीओ आणि पीपीएफएएस म्यूचुल फंड कंपनीच्या सीएसआर फंड द्वारे मदतीचा हात,वज्रेश्वरी प्राथमिक आरोग्य केंद्रास आरोग्यासाठी उपयोगी अशा विविध ९७ वस्तूंची मदत…

vishwatmaklokswamivarta