vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  यांना पदावरून हटवण्याची मागणी शिवाजीराव मोघे यांना नवे अध्यक्ष करण्याची मागणी .

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  यांना पदावरून हटवण्याची मागणी शिवाजीराव मोघे यांना नवे अध्यक्ष करण्याची मागणी…

महाराष्ट्र प्रतिनिधी

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर दुफळी निर्माण करून दलित मुस्लिम आणि आदिवासींना वेगळे केल्याचा आरोप होत आहे. पुढील प्रदेशाध्यक्ष आदिवासी समाजातील असावा, अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी पक्ष निरीक्षक रमेश चेन्निथला

  महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पदावरून हटवण्याची मागणी होत आहे. नाना पटोले यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी शिवाजीराव मोघे यांना नवे अध्यक्ष करण्याची मागणी 24 काँग्रेस नेत्यांनी केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर दुफळी निर्माण करून दलित मुस्लिम आणि आदिवासींना वेगळे केल्याचा आरोप होत आहे. पुढील प्रदेशाध्यक्ष आदिवासी समाजातील असावा, अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी पक्ष निरीक्षक रमेश चेन्निथला (Ramesh Chennithala) यांच्याकडे केली आहे.

त्यांच्यामुळेच काँग्रेसची प्रमुख व्होट बँक असलेल्या दलित, मुस्लिम आणि आदिवासींनी पक्षाशी फारकत घेतल्याचा आरोप नाना पटोले यांच्यावर करण्यात आला आहे. नाना पटोले पक्षात मनमानी करत आहेत. आता काँग्रेसमध्येही नानागिरी सुरू असल्याचा दावा शिवाजीराव मोघे यांच्या समर्थकांनी केला आहे. पक्षाच्या बैठकीत नाना पटोले कोणाचेही ऐकत नाहीत, असा गंभीर आरोप विदर्भातील 24 नेत्यांनी केला आहे

त्यामुळे पटोले यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवून आदिवासी नेते शिवाजीराव मोघे यांना प्रदेशाध्यक्ष करण्याची मागणी पक्ष निरीक्षक रमेश चेन्नीथला यांनी केली आहे. अशा परिस्थितीत आता रमेश चेन्निथ याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेस कमिटीचे सचिव रहमान खान नायडू, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य प्रकाश मुगडिया, सरदार महेंद्रसिंग सलुजा, इकराम हुसेन आणि अन्य 21 अधिकाऱ्यांनी मुंबईत रमेश चेन्निथला यांची भेट घेतली.

संबंधित पोस्ट

मुंबई-गोवा महामार्गाची कामे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तातडीने करावीत,भुयारी मार्गानजीक असलेल्या रस्त्यांसाठी २१ कोटींची तरतूद,गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे- उपमुख्यमंत्री अजित पवार,मुंबई-गोवा महामार्गाची उर्वरित कामे पूर्ण होण्यासाठी राज्यस्तरीय समिती..

अटल भूजल योजनेंतर्गत कवठेमहांकाळ येथे जिल्हास्तरीय भूजल मित्र कार्यशाळा संपन्न

vishwatmaklokswamivarta

सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कारांसाठी15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत परीक्षा मार्गदर्शन शिबिर व सत्कार सोहळा संपन्न,स्पर्धा परीक्षेची तयारी करताना स्वयंप्रेरणा महत्त्वपूर्ण  -जिल्हाधिकारी आशिष येरेकर

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा*

अभ्यासिका योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta