
प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली…
नाशिक प्रतिनिधी
प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 2017 सालच्या एका आंदोलनादरम्यान बच्चू कडू यांनी सरकारी कामांत अडथळा आणला होता. त्यावेळी नाशिक महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी बच्चू कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.
प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 2017 सालच्या एका आंदोलनादरम्यान बच्चू कडू यांनी सरकारी कामांत अडथळा आणला होता. त्यावेळी नाशिक महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी बच्चू कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने बच्चू कडू यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी बच्चू कडू यांनी प्रतिक्रीया दिली आहे. “दिव्यांग बांधवाचा ३ वर्षापासून निधी वाटप होत नाही म्हणून संबंधित आयुक्ताला ४ वेळेस पत्र देण्यात आले. दोन वेळेत दिव्यांग बांधवाने आंदोलन देखील केले.” असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.



