
*🌹ओम नमः शिवाय🌹**🌹🙏!! शुभ प्रभात !!🙏🌹*
अध्यात्मिक वार्ता
. तुम्ही जगावेगळं करत नाहीत तोवर जग तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहत नाही. कोणालाही आपलंसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही…. फक्त आपण जे बोलतो ते सत्य व प्रामाणिक असले पाहिजे…! सुखी माणसाचा सदरा शोधायचा नसतो…. संघर्ष केल्यावर देवपणाही मिळू शकतो..!
. दुरुस्ती पेक्षा देखभाल नेहमीच स्वस्त असते मग ते यंत्र असो की मानवी संबंध…!! आयुष्याचे ध्येय साध्य करण्यासाठी जिद्द इतकी महत्त्वाची असली पाहिजे की सकाळी जाग ही अलार्म वाजण्याच्या अगोदर आली पाहिजे. घड्याळाच्या गजरापेक्षा जन जबाबदारी जागं करते ती माणसे आयुष्यात योग्य दिशेने पावलं टाकत असतात. झाडावरून प्राजक्त ओघळतो त्याचा आवाज होत नाही, याचा अर्थ असा नाही की त्याला इजा होत नाही..!! पॉझिटिव्ह आहे हे समजल्यावर लांब पळून जाणारे निगेटिव्ह झाल्यावर फुलं घेऊन येतात ही आपल्या समाजाची रीतच आहे. म्हणून जेव्हा जग तुम्हाला कमजोर समजायला लागतं तेव्हा जिंकणं गरजेचं असतं.*आयुष्यातली प्रत्येक लढाई जिंकूनच पूर्ण करायचे असते…!!*
. भूतकाळात कितीही वाईट गोष्टी घडल्या तरी चांगल्या भविष्याची अशा नेहमी असावी..!! जिद्द जगण्याची असावी… आधाराची अपेक्षा नसावी… संकटे आणि समस्या यांनी आपल्याला कितीही विळखा घातला तरी सदैव निर्भय असावे या गरुडासारखे….
अधोगती लपवणारा माणूस नेहमी “ढ” राहतो..!
. आपला जन्म होतो तेंव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात… मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू लोक रडत असतील…!!
. भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको ही भावना ज्या माणसाजवळ असते तोच माणूस योग्य शब्द प्रगतीच्या वाटेवर असतो…
. चांगले वाचले की चांगले सुचते…. चांगले पाहिले की चांगले दिसते… चांगले ऐकले की जीवन घडते… भाऊ चांगले केले तर चांगलेच का होणार नाही.?
. तुम्ही कितीही हुशार असाल परंतु जर तुम्हाला माणसाची कसं वागावे समजत नसेल तर तुमच्या हुशारीला कांहीच अर्थ नाही.
. अधिकार मागणारे सगळेच असतात… जबाबदारी घेणं मात्र कुणालाही जमत नाही.
. सगळ्या गोष्टीतलं मलाच जमतं हे समजणारे लोक हेकेखोर असतात..
.*!! मराठी भाषेचा श्रृंगार*!!
. “मासा” आणि “माशी” यांचा परस्पर कांहीही संबंध नाही; पण शब्दाची अशी गंमत आहे की “माशाला” स्त्रीलिंगी शब्द नाही आणि “माशीला” पुल्लिंगी शब्द नाही.! त्यातही गंमत अशी की दोघेही कोळ्याच्या जाळ्यात अडकतात… पण त्या दोन्हीही कोळ्याचा परस्परांशी कांहीही संबंध नाही!!
याशिवाय आणखी एक गंमत म्हणजे माशाची आमटी आवडीने खाणारे आमटीत माशी पडली तर आमटीच फेकून देतात..!!!
. वेळेची वेळेवर वेळोवेळी कदर केली तर वेळ पण आपल्याला वेळ आली की वेळेवर वेळोवेळी चांगली वेळ दाखवत राहते..!!
. शुभचिंतक सगळेच असतात असं कांही नाही… कांहीजण आपलं शुभ होत असेल तर चिंतीत देखील होत असतात..!!
. *ज्याला भावना कळतात तेच रडतात नाहीतर खोट्याचे चेहरे हसरेच असतात…*!!
. मला माणसापेक्षा त्यांचे फोटो जास्त आवडतात कारण फोटोतील माणसे कधीच बदलत नसतात.
*💐शिवशंकर स्वामी इरोलीकर💐*
. आज *शुक्रवार* .तुम्ही सुखी राहा आनंदी राहा कधी कधी आठवणीने फोन पण करत जा… 🙏🏻🙏🏻🪷



