vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

मुंबईत हादरवून टाकणारी घटना : शहरातील मिरा रोड परिसरात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’  मध्ये राहणाऱ्या एका तरुणीची पार्टनरकडून हत्या आरोपी अटक..

 मुंबईत हादरवून टाकणारी घटना : शहरातील मिरा रोड परिसरात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’  मध्ये राहणाऱ्या एका तरुणीची पार्टनरकडून हत्या आरोपी अटक..

गुन्हे प्रतिनिधी

मिरा रोड परिसरात ‘लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या एका तरुणीची पार्टनरकडून हत्या झाली आहे. पीडिता 32 तर आरोपी 52 वर्षांचा गृहस्थ आहे. ही हत्या साधीसुधी नाही. मानवी मनाला हादरवून टाकणारी आहे. आरोपीने लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तरुणीची हत्या केली. तो तेवढ्यावरच थांबला नाही. त्याने तिच्या शरीराचे बारीक तुकडे केले. ते तुकडे प्रेशर कुकरमध्ये शिजवले आणि मग ते मिक्सरमध्ये बारीक केले. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपी हे तुकडे प्लॅस्टिकच्या काळ्या पिशवीत भरे आणि बाईकवरुन ही पिशवी इमारतीच्या मागे असलेल्या जागेत नेऊन टाकत असे.

इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांमुळे उघडकीस आली. इमारतीच्या एका सदनिकेतून अतिशय दुर्गंधी येत असल्याने रहिवासी त्रस्त झाले होते. त्यामुळे त्यांनी पोलिसांना या घटनेची कल्पना दिली. रहिवाशांनी दिलेल्या माहितीवरुन पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दुर्घंधी येणारी सदनिका उघडली असता धक्कादायक घटना पुढे आली. पोलिसांना घरामध्ये मृतदेहाचे तुकडे आणि अर्धवट मृतदेह आढळून आला.

पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मनोज साने असे आरोपीचे नाव आहे. तो 56 वर्षांचा आहे. तर सरस्वती वैद्य असे मृत महिलेचे नाव आहे. मीरा भाईंदर उड्डाणपूलानजिक असलेल्या गीता नगर येथे गीता आकाशदीप नावाच्या सोसायटीत फेस -7, जे विंग सदनिका क्रमांक 704 मध्ये दोघंही प्रदीर्घ काळापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात असत. हत्येचे नेमके कारण पुढे आले नाहीत. पोलीस आरोपी मनोज साने याच्याकडे चौकशी करत आहेत. लवकरच हत्येचे कारणही पुढे येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, पोलिसांनी मनोज साने याच्यावर नयानगर पोलिसांनी हत्या आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

 

संबंधित पोस्ट

माटुंगा येथे जय हिंद कॉलेजच्या २० वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या

पाच वर्षांच्या  चिमुकलीवर बलात्कार आणि हत्याप्रकरणातील आरोपीचा हुबळी पोलिसांनी एन्काऊंटर…

मतदार नोंदणीचा प्रयत्न उघडकीस; तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश दुबार नावे मागे घेण्यासाठी ३० पर्यंत मुदत

vishwatmaklokswamivarta

लाचेच्या तक्रारीसाठी कायमस्वरूपी मोबाईल क्रमांक जारी..

मुंबईत १० कोटींचा गांजा जप्त – गुजरातमधील टोळीचा पर्दाफाश, दोन आरोपींना अटक: चुनाभट्टी पोलिस….

ओरिसा येथून महाराष्ट्रात गांजा तस्कारी करणार्‍या *दोघांना *८ लाख ५४ हजार रुपयांच्या 34 किलो गांजासह अटक

vishwatmaklokswamivarta