vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

दर्जेदार शिक्षण आणि पौष्टिक आहारामुळे शिक्षित, सुदृढ युवा पिढी घडेल- विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर

दर्जेदार शिक्षण आणि पौष्टिक आहारामुळे शिक्षित, सुदृढ युवा पिढी घडेल- विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेक र

 

मुंबई प्रतिनिधी

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि पौष्टिक आहार उपलब्ध करून देण्यात शासनासमवेत खाजगी संस्थांनीही सहकार्य करावे.  यामुळे शिक्षित समाज, सुदृढ युवा पिढी घडण्यास मदत होणार असल्याचे मत विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी मांडले.

 

विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांच्या पुढाकाराने आणि हरे कृष्ण मुव्हमेंट फाऊंडेशन, अवेक ॲण्ड अराईझ या संस्थांच्या सहाय्याने अक्षय चैतन्य योजनेच्या माध्यमातून कुलाबा क्षेत्रातील महानगरपालिका शाळेतील ९ वी व १० वीतील विद्यार्थ्यांना मोफत मध्यान्ह भोजन उपक्रमाच्या शुभारंभ आज कुलाबा महापालिका माध्यमिक शाळेत अध्यक्ष ॲड.नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.

 

ॲड. नार्वेकर म्हणाले, मिड-डे मिलच्या माध्यमातून १ली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्यात येते. मात्र, हरे कृष्ण मुव्हमेंट फाऊंडेशन आणि अवेक ॲण्ड अराईड अशा खासगी संस्थांच्या मदतीने कुलाबा क्षेत्रासह मुंबईतील ७५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पौष्टिक भोजन देण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेचा प्रत्येक विद्यार्थ्याला लाभ मिळणार आहे.

 

विद्यार्थी  देशाचे भविष्य असून त्यांनी देशाला अभिमान वाटेल, असे कर्तुत्व सिद्ध करावे.  जागरूक नागरिक बनून समाजातील सर्व घटकांना सहकार्य करण्याची भावना विद्यार्थ्यांनी बाळगावी, असे आवाहनही ॲड. नार्वेकर यांनी केले. यावेळी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा ॲड. नार्वेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी हरे कृष्ण मुव्हमेंट फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरमंडल दास, उपेंद्र नारायण दास, अक्षय चैतन्य योजना राबविणारे विजय कृष्ण  दास, अवेक ॲण्ड अराईसचे संस्थापक रमा सिंग दूर्गवंशी, शाळेचे मुख्याध्यापक शंकर पवार, उपमुख्याध्यापक चंद्रमुखी निकाळे यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

 

संबंधित पोस्ट

विद्युत विभागाने अखंड व दर्जेदार वीजपुरवठा देत नागरिकांच्या समस्या प्राधाण्याने सोडवाव्या*- जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा*ब्रेकडाऊनचे ॲनालिसिस करून तांत्रिक उपाययोजना ठरवा*

vishwatmaklokswamivarta

पावसा मुळे! मुंबईत आज सकाळच्या सत्रातील सर्व शाळा, कॉलेजना सुट्टी..

नवी मुंबई महानगरपालिकेचा दोन ‘स्कॉच (SKOCH)’ पुरस्कारांनी राष्ट्रीय स्तरावर सन्मान*’कार्यक्षम व शाश्वत जलव्यवस्थापन प्रणाली’ आणि ‘कॅन्सर विषयक काळजी घेणारी कार्यप्रणाली’ यांचा देशपातळीवर गौरव

धारावीतील पंचशिल गणेश मित्र मंडळाची सुवर्णमहोत्सवी यशस्वी वाटचाल “धारावीतील पंचाशिल गणेश मित्र मंडळाचा कार्यभार पहिल्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे!

vishwatmaklokswamivarta

प्रदेश भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांना भाजपकडून विधानपरिषदेसाठी उमेदवारी?

vishwatmaklokswamivarta

शिक्षण विभागाकडून ५२ शिक्षकांना पदोन्नतीचा लाभ

vishwatmaklokswamivarta