vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

प्रदेश भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांना भाजपकडून विधानपरिषदेसाठी उमेदवारी?

प्रदेश भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांना भाजपकडून विधानपरिषदेसाठी उमेदवारी?

 

 

मुंबई प्रतिनिधी   : प्रदेश भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्याचं भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत निश्चित झाल्याचं सुत्रांकडून कळतं आहे. यामुळे आता चित्रा वाघ या आमदार म्हणून विधानसभेत सरकारला धारेवर धरताना दिसू शकतील.

मुंबई स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी चित्रा वाघ यांचं नाव सर्वात पुढे आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि प्रदेश उपाध्यक्षा असलेल्या चित्रा वाघ यांना उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित झाल्याचं सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. उद्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीनंतर होणाऱ्या कोअर कमिटी बैठकीत यावर अंतिम शिकामोर्तब होण्याची शक्यता आहे.

धुळे-नंदुरबारमधून पुन्हा अमरीश पटेल यांना संधी?धुळे-नंदुरबारमधून पुन्हा एकदा अमरीश पटेल यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तर कोल्हापूरमधून शौमिका महाडिक आणि राहुल आवाडे ही दोन नावे चर्चेत असून यातील एका नावावर शिक्कामोर्तब होईल. यामध्ये शौमिका महाडिक यांचे नाव आघाडीवर आहे. शौमिका महाडिक या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा राहिलेल्या आहेत. नागपूरच्या जागेसाठी भाजपत अद्याप खल सुरू आहे.

दरम्यान, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या १० डिसेंबर रोजी यासाठी मतदान पार पडणार असून १४ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

 

संबंधित पोस्ट

जिल्हाभरात पोळा सणापासून ते दीपावलीपर्यंत दुध व दुग्धजन्य पदार्थांची भेसळ रोखण्यासाठी मोहीम

रामनगर येथे दीपावली व पाडवा स्नेह मिलन सोहळा उत्साहात संपन्न*

vishwatmaklokswamivarta

धार्मिक उपक्रमांमुळे गावात एकोपा व संस्कारात वाढ होते – भास्कर आबा दानवे लोंढेवाडी येथे भागवत कथा ज्ञानयज्ञ व ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील बाबुलनाथ मंदिराजवळ रस्ता दुरुस्तीचे काम वाहतुकीचा खोळंबा होत आहे पर्यायी मार्गाचा वापर करा मुंबई पोलीस वाहतूक विभाग

मल्हारपेठ ते कोळोली या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवावेत – पालकमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातील सीता मातेचे जन्मस्थान असलेल्या पुनौराधाम मंदिर आणि परिसराच्या समग्र विकासासाठी केले भूमिपूजन,विरोधी पक्षांना घुसखोरांची मते हवी आहेत मात्र बिहारचे लोक याचा स्वीकार करणार नाहीत