vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

पर्जन्यदेवतेच्या प्रार्थनेने सुरू केली की देह मंदिर

📕अंतर्यात्रा .📗पर्जन्यदेवतेच्या प्रार्थनेने सुरू केली की देह मंदिर…

 

शुभ प्रभात . मंगल प्रभात .

आपली सकाळ पर्जन्यदेवतेच्या प्रार्थनेने सुरू केली की देह मंदिर प्रसन्न होते , सकारात्मक उर्जेने रंगते , खूप छान वाटतं .💧🫧💦

ठरल्याप्रमाणे दर बुधवारी सायंकाळी ७ ते ८ एक तास स्वाध्याय केंद्र सुरू करण्याचा निर्णय झाला .ठिकाणही ठरलं . बुधवार उजाडला . खेडकर बाबांसह पगारे दादा व गांधीनगरचा समुह सायंकाळी ४ वाजेपासून आमच्या परिसरात घरोघर भावसंपर्क करू लागला .६ . ३० पर्यंत भावफेरी करून ठरलेल्या ठिकाणी तो समुह एकत्र जमला . त्या परिसराची स्वच्छता , सडा रांगोळ्या करून सजावट करण्यात आली . जवळ जवळ ३५ ते ४० बंधुभगिनींची उपस्थिती व देवळाली गांव , गांधीनगर प्रेस क्वार्टर येथून आलेले ९ स्वाध्यायी असा समुह जमला . त्यांच्या सूचनेप्रमाणे प्रारंभी दोन श्लोक , भावगंगेतील गीत , प्रार्थना प्रीतितील आष्टक , श्रीमद्भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाचे पाच श्लोक संथा देऊन म्हणण्यात आले .आदरणीय पटेलकाका यावेळी उपस्थित होते . त्यांनी चिंतनिका दिली .स्वाध्याय केंद्र म्हणजे काय ?त्यासंबंधी नियम , निकष , संकेत , आचारसंहिता सविस्तर सांगितली . रोहा जि . रायगड येथील पू . दादाजींच्या आठवले परिवाराची अध्यात्मिक पार्श्वभूमी कळली . प्राध्यापक असलेल्या पटेल काकांची विषय समजावून सांगण्याची पद्धत विलक्षण प्रेरणादायी असल्यामुळे ते चिंतन उपस्थितांच्या अंतःकरणाला भिडले . आम्ही जे ऐकलं ते आमच्या दृष्टीने सर्व नविन ज्ञान होतं . शेवटी आरती झाली व केंद्र संपन्न झाले .नंतर पटेलकाका म्हणाले तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा . जवळ जवळ १५ मिनिटे विचारांची देवाणघेवाण झाली .केंद्रासाठी प्रत्येकाला लागणारं वाङ्मय आम्हाला हवं होतं .📚📕📗 आम्ही मागणी केल्यावर भावगंगा , प्रार्थना प्रीति , श्रीमद्भगवद्गीता , जीवभावना , भारतीयांचे आदर्श सांस्कृतिक जीवन , त्रिकालसंध्या , आपण खरोखर सुधारलो आहोत का , तरूण , भगवंताची उत्कृष्ट कलाकृती स्त्री , जीवनतीर्थ , श्रीकृष्ण जीवनदर्शन , श्राद्ध भाग १ , श्राध्द भाग २ , ऋषिस्मरण, संस्कृती पूजन या स्वरूपातील पू . दादाजींच्या मंगल प्रवचनांवर आधारित वाङ्मय प्रत्येकाने आपापल्या आवडीनुसार व गरजेनुसार खरेदी केले . इथं एक गोष्ट नमूद कराविशी वाटते की स्वाध्याय केंद्रामुळे आमच्या व कुटुंबाच्या जीवनात एक नवा अध्याय सुरू झाला जो तत्कालीन जीवनप्रवाहापेक्षा उत्तुंगतेकडे झेपावणारा होता .आपल्या आयुष्यात अशा काही घटना घडतात की त्यामुळे आपल्या जीवनात आश्चर्यकारक परिवर्तन घडते . स्वाध्यायामुळे आमचंही असंच झालं .👏💐✒️👏🦚👏💐

संबंधित पोस्ट

शिव आहेत म्हणून आपण आहोत-साक्षीताई मुळेआज पद्मीनीताई खराडे कीर्तन..

vishwatmaklokswamivarta

शिवलीलामृत* 🌹 ( मराठी विवेचनासह ) *अध्याय पहिला*

🚩 !!श्री वडवाळसिध्दनागेश!! 🚩     श्री नागनाथ देवस्थान पंचकमिटी    श्रीक्षेत्र वडवाळ    卐श्री तीर्थक्षेत्र वडवाळ卐  ॐ॥श्री नागनाथ दर्शन॥ॐ

जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज स्व-स्वरूप संप्रदाय यांच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन…

सुख हे कायमस्वरुपी असायला हवे-हभप डॉ. भगवान बाबा आनंदगडकर,सकाळीच कॉलनीतून निघालेल्या दिंडीने लोकांना आकर्षित केले तर काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता

vishwatmaklokswamivarta

नवरात्र म्हणजे काय ? त्याला शारदिय नवरात्र का म्हणतात ?

vishwatmaklokswamivarta