vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञान

बालगृहांच्या सुरक्षेसाठी बायोमेट्रिक प्रणाली आणि सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने कार्यान्वित करावे- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

बालगृहांच्या सुरक्षेसाठी बायोमेट्रिक प्रणाली आणि सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने कार्यान्वित करावे- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 

मुंबई, प्रतिनिधी : बालगृहांमधील बालकांच्या सुरक्षेसाठी एका महिन्यात बायोमेट्रिक प्रणाली आणि सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करावेत. बालकांना देण्यात येणाऱ्या अन्न, सुरक्षा आणि स्वच्छतेबाबतचा अहवाल दर तीन महिन्यांनी सादर करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

 

राज्यातील बालगृहे, विशेष गृहे, खुले निवारा गृह, बालकांसाठी सुरक्षित ठिकाण, अनुरक्षणगृहे याबाबत आज मंत्रालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार श्रीवास्तव, आयुक्त प्रशांत नारनवरे, सहसचिव शरद अहिरे, सह आयुक्त राहुल मोरे बैठकीत उपस्थित होते.

 

मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, ज्या संस्थांमध्ये बालकांसंदर्भात गैरप्रकार घडले आहेत अशा संस्थांची नावे काळ्या यादीत टाकण्यात यावीत.

 

बालकांसाठी अशासकीय संस्था तसेच शासकीय अनुदानावर सुरू असलेल्या संस्थांच्या अन्न, सुरक्षा आणि स्वच्छतेबाबत कार्यप्रणाली तयार करावी, त्यांची तपासणी करून दर तीन महिन्याला अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. बालकांना चांगल्या प्रतीचे खाद्य मिळावे यासाठी मानक कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात यावा.

 

कार्यरत असलेल्या बालगृहांच्या संस्थाद्वारे मुलांना देण्यात येणाऱ्या सुविधा आणि सुरक्षा व्यवस्थेवर देखरेख करण्यावर जास्त भर देण्यात यावा, बालसंगोपन योजनांसंदर्भात जनजागृती करण्याच्या सूचनाही मंत्री कु. तटकरे यांनी दिल्या.

तसेच, बालगृहांतील रिक्त जागांबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

 

 

वृ

संबंधित पोस्ट

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन..

शेतकऱ्यांसाठी महाविस्तार एआय अप शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र..

vishwatmaklokswamivarta

उत्कृष्ट छायाचित्रांना ठाणे जिल्हा प्रशासनाकडून मिळणार गौरव.! छायाचित्रे पाठविण्याची अंतिम मुदत 17 सप्टेंबर

vishwatmaklokswamivarta

सायबर गुन्ह्यात ‘फ्रीज’ केलेल्या बँका खात्यांना पोलिस प्रमाणपत्रावर बँकांनी खुले करावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उद्योग विभाग:उच्च तंत्रज्ञानावरील अतिविशाल प्रकल्प योजनेत सुधारणाअधिकाधिक प्रकल्पांना प्रोत्साहन

पर्यावरण संवर्धनासाठी कमी कार्बन उत्सर्जनवर भर द्यावा.- माहिती तंत्रज्ञान मंत्री, ॲड. आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta