vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

गणेशोत्सव मंडळांसाठी आनंदाची बातमी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय, ५ वर्षांसाठी एकदाच घ्यावी लागणार परवानगी.

गणेशोत्सव मंडळांसाठी आनंदाची बातमी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय, ५ वर्षांसाठी एकदाच घ्यावी लागणार परवानगी.

 

मुंबई प्रतिनिधी उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुढील पाच वर्षाकरिता उत्सवाकरिता एकदाच परवानगी घ्यावी लागणार आहे. अशी परवानगी देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता.

 

43 इंच टीव्हीवर उत्तम ऑफर- फिचर्स आणि आकारातही सरस

या निर्णयामुळे गत दहा वर्षांत सर्व नियम, कायकायद्यांचे पालन करणाऱ्या, कोणत्याही तक्रारी नसलेल्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना दिलासा मिळाला आहे. तसेच त्यांना आगामी वर्षांसाठी आणखी उत्कृष्ट नियोजन करता येणार आहे.

 

 

उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन मिळावे यासाठी पुढील पाच वर्षाकरिता एकदाच परवानगी देण्याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मागणी करण्यात आली होती. यावेळी एका याचिकेवर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांकडेही लक्ष वेधण्यात आले होते. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार नगर विकास विभाग शासन निर्णय जाहीर केला आहे.

 

 

या निर्णयानुसार यावर्षीच्या १९ सप्टेंबर २०२३ पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात शासन नियमांचे व कायद्यांचे पालन करणाऱ्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुढील पाच वर्षांकरिता परवानगी देण्याची कार्यवाही सर्व महानगरपालिका, सर्व नगरपालिका व नगरपंचायती यांनी करावी लागणार आहे.

महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायती यांच्या मालकीच्या जागेवर गणेशोत्सव मंडळांना गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जागा देतांना नाममात्र असे शंभर रुपये भाडे घेता येईल.

 

तसेच उत्सवाकरिता यापूर्वी वेळोवेळी विहित केलेल्या शासन निर्णय, आदेश यानुसार अटी, शर्तीचे मंडळांना पालन करावे लागेल. मंडळांना स्थानिक पोलीस स्टेशन यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून ऑनलाईन माध्यमातून संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांकडे परवानगीसाठी अर्ज करावा लागणार आहे.

संबंधित पोस्ट

मराठी भाषेची ख्याती विश्वस्तरावर पोहोचवण्यासाठी विश्व मराठी संमेलनात सर्वांचा सहभाग महत्त्वाचा-मराठी भाषा मंत्री उदय सामंत

vishwatmaklokswamivarta

पुणे येथे भोर तालुक्यातील भाटघर धरणात पाच तरुणींचा बुडून मृत्यू, चौघींचे मृतदेह सापडले

प्रॉपर्टी एक्स्पो 2025’ प्रदर्शनाची नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केली पाहणी- प्रदर्शनातील नवी मुंबई महानगरपालिकेच्या माहितीप्रद स्टॉलला अनेक विकासक व नागरिकांची भेट

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दिव्यांग उमेदवारांना मार्गदर्शक सूचना-मागणीप्रमाणे परीक्षेच्यावेळी लेखनिक उपलब्ध करुन देण्यात येणार

vishwatmaklokswamivarta

जनतेशी सुसंवाद’ कार्यक्रमात तातडीने दाखले मिळू लागल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य..

vishwatmaklokswamivarta

अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढणार? तुरुंगातून दिलेल्या ‘त्या’ आदेशाची ईडी करणार चौकशी..

vishwatmaklokswamivarta