vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ

विनाअनुदानित खेळाच्या शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनासाठी खेळांच्या पदाधिकाऱ्यांची 6 ऑक्टोबरला बैठक

विनाअनुदानित खेळाच्या शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनासाठी खेळांच्या पदाधिकाऱ्यांची 6 ऑक्टोबरला बैठक.

        सांगली, प्रतिनिधी शासनाने सन 2023-24 च्या शैक्षणिक वर्षातील शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी एकूण 90 खेळाच्या (अनुदानित व विनाअनुदानित) तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तर शालेय क्रीडा स्पर्धेस मान्यता प्रदान केली आहे. विनाअनुदानित खेळाच्या शालेय क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संबंधित खेळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3 वाजता सांगली हायस्कूल आमराई जवळ सांगली या ठिकाणी आयोजित केली आहे. या बैठकीस संबंधित खेळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वत: वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी केले आहे.

 

‍जिल्हा संघटनेने पुढील विनाअनुदानित खेळांच्या स्पर्धेचे तांत्रीकदृष्ट्या यशस्वी आयोजन करावयाचे आहे. आष्टे-डू-आखाडा, युनिफाईट, कुडो, स्पीडबॉल, टेग-सु-डो, फिल्ड आर्चरी, मॉटेक्सबॉल ‍क्रिकेट, मिनीगोल्फ, सुपर सेवन क्रिकेट, बेल्ट रेसलिंग, फ्लोअरबॉल, थायबॉक्सींग, हाफकिडो बॉक्सींग, रोप स्किपींग, सिलंबम, वूडबॉल, टेनिस व्हॉलीबॉल, थांग ता मार्शल आर्ट, कुराश, लगोरी, रस्सीखेच, पॉवरलिफ्टींग, बीच व्हॉलीबॉल, टार्गेटबॉल, टेनिस क्रिकेट, जित कुने दो, फुटसाल, कॉर्फबॉल, टेबल सॉकर, हुप क्वॉन दो, युग मुन दो, वोवीनाम, ड्रॉप रो बॉल, ग्रॅपलिंग, पेंन्टाक्यू, लंगडी, जंपरोप, स्पोर्ट डान्स, चॉकबॉल, चॉयक्वांदो, फुटबॉल टेनिस, बुडो, म्युजिकल चेअर, टेनिसबॉल क्रिकेट.

 

अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी (दूरध्वनी क्रमांक 0233-2990616) संपर्क साधावा.

 

00000

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2023 करिता केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने मागविले अर्ज.

क्रीडापटूंसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करून द्या – मंत्री आदिती तटकरे

.भारतीय संघानं ओव्हल मैदानावर इतिहास घडवला. १९७१नंतर टीम इंडियानं प्रथमच ओव्हलवर कसोटी सामना जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला.

vishwatmaklokswamivarta

क्रीडा महोत्सवात अधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या उत्साही वातावरणात नोंदवला सहभाग-अधिकारी-कर्मचारी यांनी शारिरीक स्वास्थासाठी खेळांची आवड जोपासावी- मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे

vishwatmaklokswamivarta

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदक

राज्यस्तरीय शालेय बॉल बॅडमिंटन व टेनिक्वाईट स्पर्धेचा समारोप…

vishwatmaklokswamivarta