vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

ग्रामपंचायत निवडणूक : जात प्रमाणपत्र त्रुटी पुर्तता शिबीरास उपस्थित राहाण्याचे आवाहन 

ग्रामपंचायत निवडणूक : जात प्रमाणपत्र त्रुटी पुर्तता शिबीरास उपस्थित राहाण्याचे आवाहन

 

        राज्य प्रतिनिधी: ग्रामपंचायत निवडणूक 2022-23 मध्ये राखीव प्रवर्गावर निवडून आलेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी समिती कार्यालयाकडे जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज सादर केला आहे, परंतु समिती कार्यालयाने कळविलेल्या त्रुटींची अद्याप पुर्तता केली नाही अथवा समिती कार्यालयाशी संपर्क केला नाही, अशा उमेदवारांकरीता 9 ते 20 ऑक्टोबर 2023 पर्यंत तालुकानिहाय विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे. संबंधित तालुक्यातील उमेदवारांनी शिबीराच्या दिवशी मुळ कागदपत्रांसह जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती सांगली येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव संभाजी पोवार यांनी केले आहे.

 

जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती सांगली येथे आयोजित तालुकानिहाय शिबीराचा दिनांक पुढीलप्रमाणे. वाळवा-इस्लामपूर 9 ऑक्टोबर, शिराळा 10 ऑक्टोबर, तासगाव 11 ऑक्टोबर, कवठेमहांकाळ 12 ऑक्टोबर, कडेगाव 13 ऑक्टोबर, पलूस 16 ऑक्टोबर, आटपाडी 17 ऑक्टोबर, मिरज 18 ऑक्टोबर, खानापूर-विटा 19 ऑक्टोबर व जत 20 ऑक्टोबर 2023.

 

00000

संबंधित पोस्ट

ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्यासाठी संबंधित विभागांची एकत्रित बैठक घेऊ- सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

पंतप्रधान इंटर्नशिप योजना’, लाभ घेण्याचे आवाहन

आदिवासी सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी गुणवत्तेनुसार वाढीव व्यवस्थापकीय अनुदान द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

बार,दारु दुकानांची संयुक्त तपासणी करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

नागपूरला पाच अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये४५ पदांनाही मंजुरी

शिधापत्रिका धारकांनी ई-केवायसी 31 जुलैपर्यंत करावी