vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

समृध्दी महामार्गावरील जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानची वाहतूक तीन दिवस काही तासांसाठी वळविली

समृध्दी महामार्गावरील जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानची वाहतूक तीन दिवस काही तासांसाठी वळविली

 

 

 

राज्य प्रतिनिधी जालना  :- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गावरील जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दोन्ही बाजुची वाहतूक दि.31 ऑक्टोबर ते दि.2 नोव्हेंबर 2023 या कालावधीत प्रत्येक दिवशी दुपारी 12 ते दुपारी 3.30 या वेळेत पॉवर ग्रिड ट्रान्समीशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरच्या कामासाठी बंद करण्यात येणार आहे, तरी या दिवशी इतर वेळेत याभागातील समृध्दी महामार्गावरील वाहतूक सुरळीतपणे चालू राहील. असे छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिक्षक अभियंता तथा प्रकल्प संचालक रामदास खलसे यांनी दिली.

 

समृध्दी महामार्गावरील जालना इंटरचेंज (IC-१४) ते सावंगी इंटरचेंज (१०-१६) दरम्यान समृध्दी महामार्गवरुन नागपूरकडुन मुंबईकडे जाणारी वाहतूक, “निधोना (जालना) इंटरचेंज क्र. IC-१४ मधुन बाहेर पडुन निधोना एमआयडीसी मार्गे राष्ट्रीय महामार्ग ७५३ A (जालना – छत्रपती संभाजीनगर) मार्गे केंब्रीज शाळेपर्यंत – नंतर ती उजवीकडे वळून सावंगी बायपास मार्गे सावंगी इंटरचेंज क्र. IC-१६ (छत्रपती संभाजीनगर)” येथे समृध्दी महामार्गावर प्रवेश करुन शिर्डीकडे रवाना होईल.

 

समृध्दी महामार्गावरील शिर्डीकडुन नागपूरकडे जाणारी वाहतूक, “सावंगी इंटरचेंज क्र. IC-१६ (छत्रपती संभाजीनगर) येथून बाहेर पडुन वर नमूद केलेल्या मार्गावरुन (विरुध्द दिशेने) निधोना (जालना) इंटरचेंज क्र. IC-१४” या ठिकाणी समृध्दी महामार्गावर प्रवेश करुन नागपूरकडे रवाना होईल. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

 

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

कुष्ठरोगविषयक संदेश देणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद..

vishwatmaklokswamivarta

महिला दिनानिमित्त पूर्ण मार्च महिना महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन

सांघिक आपत्ती व्यवस्थापनासाठी यंत्रणा अलर्ट मोडवर

पालक सचिव यांनी घेतला विकास कामाचा आढावा· पालक सचिव पराग जैन यांनी घेतला जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा..

vishwatmaklokswamivarta

सर्वच एचआयव्ही संसर्गित रूग्णांना मोफत ART औषधोपचार   – जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ‍विक्रमसिंह कदम,जागतिक एड्स दिन व पंधरवड्यामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन.

vishwatmaklokswamivarta

उमेद’ने केले पावणे दोन लाख कुटुंबांचे समुपदेशन-100% मतदान जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासन कंबर कसून मैदानात; मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची माहिती

vishwatmaklokswamivarta