
कोलकाता येथे वर्ल्ड कप 2023 चा 37 वा सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 243 धावांनी पराभव करत विजयी मिळवला..मुरादाबादमध्ये एका वधू-वरांनी टीम इंडियाचा विजय अनोख्या पद्धतीने साजरा केला
क्रिकेट प्रतिनिधी
कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वर्ल्ड कप 2023 चा 37 वा सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 243 धावांनी पराभव करत विजयी घोडदौड सुरू ठेवली
मुरादाबादमध्ये एका वधू-वरांनी टीम इंडियाचा विजय अनोख्या पद्धतीने साजरा केला याचा होत आहे सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने निर्धारित 50 षटकांत 5 गडी गमावून 326 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ 27.1 षटकांत केवळ 83 धावा करून अपयशी ठरला. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये एका वधू-वरांनी टीम इंडियाचा विजय अनोख्या पद्धतीने साजरा केला. वधू-वरांनी त्यांच्या नातेवाईक आणि मित्रांसोबत टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा विजय साजरा केला. वर म्हणाला, “हा माझ्यासाठी ‘दुहेरी धमाका’ आहे कारण आज माझे लग्न आहे आणि आज भारतानेही जिंकले आहे आणि विराट कोहलीने सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.”



