vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दूध व दुग्धजन्य पदार्थात भेसळ करणाऱ्यांविरुध्द जिल्हा प्रशासनाची धडक तपासणी मोहिम भेसळीची माहिती देण्याचे आवाहन 

दूध व दुग्धजन्य पदार्थात भेसळ करणाऱ्यांविरुध्द जिल्हा प्रशासनाची धडक तपासणी मोहिम भेसळीची माहिती देण्याचे आवाहन

 

 

 

राज्य प्रतिनिधी:- दिपावली सणानिमित्त दुग्ध व दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती फार मोठ्या प्रमाणात केली जाते, त्यामुळे या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकारास आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत धडक तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.

 

दुध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये केल्या जाण्याऱ्या भेसळीमुळे जनतेच्या विशेषत: लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या गुणवत्तापूर्ण दुधास योग्य दर मिळत नाही, पर्यायाने शेतकऱ्यांचे नुकसान होते व भेसळखोर स्वतःचा फायदा करुन घेतात. दुध व दुग्धजन्य पदार्थांच्या बाजारपेठेत होणारी भेसळ रोखण्यास जिल्हास्तरीय समिती मार्फत धडक तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.

 

दरम्यान, बाजारपेठेत दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणाऱ्या भेसळीबाबत माहिती कळाल्यास नागरिकांनी तात्काळ याबाबतची माहिती अपर जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, जालना येथे द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी तथा दूध व दुग्धजन्य पदार्थांत होणारी भेसळ रोखणाऱ्या जिल्हास्तरीय समितीच्या अध्यक्षा रिता मेत्रेवार आणि जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी आर.बी. मते यांनी केले आहे.

 

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

पुण्यात आज हिंदु जनआक्रोश मोर्चा, लाल महालपासून मोर्चाला सुरुवात

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत आर्थिक समावेशन संपृक्तता मोहीम नागरिकांनी सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे नागरिकांना आवाहन

प्रासंगिक लेख / जयंती दिन विशेष-कर्मयोगी संत गाडगेबाबा आणि समाजप्रबोधन

vishwatmaklokswamivarta

जिल्हा रुग्णालयात #हृदयरोग निदान व #आरोग्यशिबीर संपन्न शिबिरात 181 बालकांची तपासणी तर 75 पात्र बालकांवर किम्स हॉस्पिटल ठाणे येथे लवकरच मोफत हृदय शस्त्रक्रिया                                                                                  

vishwatmaklokswamivarta

आयटीआय गटनिदेशकांना मिळणार पदोन्नतीआमदार सुधाकर अडबाले यांचे निर्देश : सहसंचालक यांचे बैठकीत आश्‍वासन..

परमबीर सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच खडसावले…