vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

रायगड जिल्ह्यातील दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसनाचे प्रस्ताव सादर करा — मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

रायगड जिल्ह्यातील दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसनाचे प्रस्ताव सादर करा — मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

 

 रायगड प्रतिनिधी मौजे मेढा हनुमाळ माळी,शिंगरकोंड (मोरेवाडी), तिसे या गावातील आणि रायगड जिल्ह्यातील दरड प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने देखील प्रस्ताव प्रशासनाकडून मागवून याबाबतीत तातडीने कार्यवाही करण्याची ग्वाही मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.दरडग्रस्त पुनर्वसनाबाबत विविध समस्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी बैठकीत मांडल्या.

 

मंत्रालयातील दालनात रायगड जिल्ह्यातील दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसनाबाबत आयोजित बैठकीत मदत व पुनर्वसन अनिल पाटील बोलत होते. यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे,आमदार अनिकेत तटकरे, उपसरपंच वरसगाव राकेश शिंदे, पुनवर्सन विभागाचे अधिकारी उपसरपंच तिसे राजेश कदम,सरपंच संगे संजय सानप,मेढाचे सदानंद गोवर्धने,जयंत गोवर्धने,तिसे ग्रामपंचायत सदस्य महेश पवार,संभेचे गणेश सानप,संदेश सानप यावेळी उपस्थित होते.

 

मंत्री अनिल पाटील म्हणाले,रायगड जिल्ह्यातील दरडप्रवण क्षेत्रातील गावांचे कायमस्वरूपी करावयाचे पुनर्वसनाबाबत स्थानिक प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी.शासनाकडून आलेल्या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही केली जाईल,त्याचबरोबर म्हसळा तालुक्यातील लिपनी वावे व मोहम्मद खनीखार या गावाच्या पुनर्वसन प्रस्तावावर जिल्हाधिकारी कार्यालयाने तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री अनिल पाटील यांनी दिले.

 

दरडग्रस्त पुनर्वसनाबाबत तातडीने कार्यवाही करण्याची महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची मागणी

 

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या,मौजे मेढा हनुमाळ माळी गावचे पुनर्वसन करणे,मोजे तिसे येथे दरड कोसळल्या बाबत,भिंगारकोड (मोरेवाडी) या गावातील दरड ग्रस्त कुटुंबीयांचे कायमस्वरूपी पुनर्वसन होण्याबाबत रायगड जिल्ह्यातील दरड प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने कार्यवाही होणे गरजेचे आहे.स्थानिक प्रशासनाकडून मदत व पुनर्वसन विभागाला आलेल्या प्रस्तावाना लवकर मान्यता मिळावी अशी मागणी केली. ज्यायोगे या प्रस्तावाची कामे तातडीने सुरू करता येतील असेही मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

**

संबंधित पोस्ट

जालना तालूक्यातील रोहनवाडी आणि पानशेंद्रा भागात अतिवृष्टीने झालेल्या,नुकसानग्रस्त भागाची उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली पाहणी

vishwatmaklokswamivarta

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्राच्या घरावर ईडीने छापा टाकल्यानंतर आता ईडीने त्यांना पॉर्नोग्राफी प्रकरणी समन्स..

vishwatmaklokswamivarta

फायबर ग्लास बोटींच्या माध्यमातून आपत्कालिन व्यवस्थेचे बळकटीकरण- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- 25 फायबर ग्लास बोटींचे लोकार्पण..

vishwatmaklokswamivarta

२७-२८ डिसेंबर दरम्यान राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता,शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजांकडे लक्ष ठेवून नियोजन करण्याचे कृषी विभागाचे आवाहन…

vishwatmaklokswamivarta

अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यांची अत्याधुनिक तंत्रज्ञानाने होणार स्वच्छता,स्वच्छतेसाठी जर्मन बनावटीच्या 3 अत्याधुनिक मशिन्स उपलब्ध

मराठवाडा, विदर्भात जोरदार पाऊस, नद्यांना पूर; अनेक गावांचा संपर्क तुटला..