vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

मेगा वस्त्रोद्योग प्रकल्पांना देखील सामुहिक प्रोत्साहन योजना,वस्त्रोद्योग धोरणात सुधारणा..

मेगा वस्त्रोद्योग प्रकल्पांना देखील सामुहिक प्रोत्साहन योजना,वस्त्रोद्योग धोरणात सुधारणा..

 

 

व्यावसायिक प्रतिनिधी राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणात सुधारणा करून मेगा वस्त्रोद्योग प्रकल्पांना देखील उद्योग विभागाच्या सामुहिक प्रोत्साहन योजनेचा लाभ देण्याचा तसेच नंदूरबार जिल्ह्याचा समावेश झोन तीन मधून झोन दोन मध्ये करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

 

30 मे 2023 रोजी राज्याचे वस्त्रोद्योग धोरण जाहीर करण्यात आले असून यामध्ये 25 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्यात येणार आहे. तसेच 5 लाखांपर्यंत रोजगार निर्मिती देखील होणार आहे. हे धोरण जाहीर झाल्यावर वेगवेगळ्या वस्त्रोद्योग घटक व संघटनांनी शासनास दिलेल्या निवेदनानुसार या धोरणात सुधारणा करण्यात येऊन आकांक्षित जिल्हा असलेल्या नंदूरबारचा समावेश झोन तीन मधून झोन दोन मध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला. उद्योग विभागाच्या सामुहिक प्रोत्साहन योजनेत वस्त्रोद्योग विशाल प्रकल्पांना दर्जा व प्रोत्साहने देण्यात येतील अशी सुधारणा देखील करण्यात आली.

 

—–०—–

संबंधित पोस्ट

कोल्हापुरातील घटना जळालेल्या कारमध्ये मृतदेह सापडल्याने खळबळ, हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील घटना…

अनधिकृत कर्जमाफी मोहिमांबाबत सावधानता बाळगण्याचे RBI मार्फत आवाहन

vishwatmaklokswamivarta

मौजपुरी येथील अजिंक्य ढोकळे तालुक्यातून प्रथम

vishwatmaklokswamivarta

औरंगाबाद येथे G 20 परिषदेअंतर्गत 27 आणि 28 फेब्रुवारी दरम्यान जागतिक महिला परिषदेचे आयोजन होत आहे. परिषदेसाठी विविध देशातून महिला प्रतिनिधींचे आगमन 

vishwatmaklokswamivarta

आदर्श राज्याचा वस्तुपाठ छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्यवर्ती संग्रहालयात वाघनखे व शिवशस्त्र दालनाचे उदघाटन,विदर्भातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी भेट देण्याचे आवाहन लेझीम, ढोल-ताशे, दिंडी पथकाच्या मिरवणुकीतून मुख्यमंत्र्यांचे स्वागत

vishwatmaklokswamivarta

उद्योजकता विकास व प्रेरणादायी प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न

vishwatmaklokswamivarta