vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मराठा आरक्षणासंदर्भात कागदपत्री पुरावे जिल्हयातील नागरिकांना सादर करण्याचे आवाहन…दस्तावेज जुने अभिलेखे कागदपत्री पुरावे स्विकारण्यासाठी तहसिल व जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापन

मराठा आरक्षणासंदर्भात कागदपत्री पुरावे जिल्हयातील नागरिकांना सादर करण्याचे आवाहन…दस्तावेज जुने अभिलेखे कागदपत्री पुरावे स्विकारण्यासाठी तहसिल व जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापन

 

 

 

रायगड प्रतिनिधी- मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी मा. न्यायमूर्ती श्री. संदीप शिंदे (निवृत्त) यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे . शासन निर्णयान्वये शासनाचे विविध विभागामार्फत जातप्रमाणपत्र वितरित करण्याकरीता पुरावे संकलीत करणेचे काम प्रगतीपथावर आहे. त्याअनुषगाने जिल्हयातील नागरिकांकडून त्यांच्याकडील उपलब्ध असलेले पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसूली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज इतर जुने अभिलेखे स्वीकारण्यात येणार आहेत. अधिक व्यापक कामकाज होणेकरीता नागरीकांमार्फत त्यांच स्तरावर असलेले पुरावे सादर करणे सोईचे होईल.

 

रायगड जिल्हयातील नागरिकांकडून त्यांच्याकडील उपलब्ध असलेले पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसूली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज इतर जुने अभिलेखे स्विकारण्याची येणार आहेत. सदर उपलब्ध पुरावे तालुक्यातील तहसिलस्तरावरील स्थापित विशेष कक्षात किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील स्थापित विशेष कक्षात दि. 21/11/2023 ते 24/11/2023 या कालावधीत स्वीकारण्यात येणार आहेत. तरी नागरिकांनी त्यांचेकडील उपलब्ध पुरावे 2 प्रतीसह नमुद ठिकाणी सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

उद्धव ठाकरे यांच्या फार्म हाऊसवर पैशांचे गोदाम, तिथचं लपवल्या आहेत 2000 च्या नोटा; नितेश राणेंच्या आरोपामुळे खळबळ..

vishwatmaklokswamivarta

अमेरिकेतून आलेल्या बंगालबद्दलच्या अशा भयंकर अहवालाने जगभरात खळबळ उडवून दिली आहे.प्रसिद्ध अमेरिकन पत्रकार जेनेट लेव्ही यांनी आता बंगालवर लिहिलेला लेख आणि त्यात जे खुलासे केले आहेत, ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल.

vishwatmaklokswamivarta

बिहारमध्ये सुरू असलेल्या विशेष निवडणूक तपासणी  मोहिमेत मतदार पडताळणी दरम्यान नेपाळ, बांगलादेश आणि म्यानमार येथील काही व्यक्ती सापडल्या आहेत.१ ते ३० ऑगस्ट दरम्यान सखोल चौकशी होणार असून, अयोग्य आढळलेल्या नावांना ३० सप्टेंबरला अंतिम यादीतून वगळण्यात येईल.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीला (एनडीए) भेट

खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजना इच्छुक शेतकऱ्यांनी संपर्क साधावा..

स्वराज्य’ संघटनेची स्थापना; राज्यसभा अपक्ष लढविण्याचीही घोषणा…संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून