vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

विधानपरिषद लक्षवेधी :शाळांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखण्यासाठी भरारी पथके- मंत्री धर्मराव बाबा आत्राम

विधानपरिषद लक्षवेधी :शाळांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखण्यासाठी भरारी पथके- मंत्री धर्मराव बाबा आत्राम

 

 

 

नागपूर, प्रतिनिधी : राज्यातील शाळांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करण्यास शासनाने मनाई आदेश लागू केला आहे. शाळांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री रोखण्यासाठी भरारी पथके निर्माण करण्यात येणार असल्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी विधानपरिषदेत सांगितले.

 

राज्यातील शाळांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री संदर्भात सदस्य विक्रम काळे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. आत्राम बोलत होते.

 

मंत्री श्री. आत्राम म्हणाले की, राज्यातील शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थ मिळू नये म्हणून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर जरब बसविण्यासठी राज्यातील संबंधित यंत्रणा व पालकांची एक संयुक्त बैठक घेऊन कडक कायदा करण्यात येणार आहे. वेळप्रसंगी ‘मोक्का’ लावण्यासाठी प्रयत्न केला जाईल.

 

अन्न व औषध प्रशासन विभागाने गेल्या वर्षभरात या पदार्थाची विक्री करणाऱ्या टपऱ्यांविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. ही कारवाई सतत सुरू आहे. शाळांमधील विद्यार्थी नकळत व्यसनाकडे ओढला जाऊ नये यासाठी विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षण संस्थांचे मुख्याध्यापक, शाळा कृती समितीचे पदाधिकारी यांना अधिक दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत.

 

केंद्र सरकार यासंदर्भात कायदा करीत असून, तो अंतिम टप्प्यात आहे. तो कायदा अस्तित्वात आल्यानंतर तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण येणार आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागात मनुष्यबळ वाढवित येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

 

यावेळी सदस्य सर्वश्री सुरेश धस, शशिकांत शिंदे, महादेव जानकर, सचिन अहिर, भाई जगताप, नरेंद्र दराडे, रामदास अंबटकर, अमोल मिटकरी यांनी सहभाग घेतला.

 

0000

संबंधित पोस्ट

भाजपा प्रवक्ते आणि आमदार राम कदम यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा संघटनासोबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या बैठकीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला..

vishwatmaklokswamivarta

सुराज्य अभियानाचे प्रसिद्धीपत्रक !*_पंढरपूरसह अन्य तीर्थक्षेत्री रिक्शा चालकांवर नियंत्रण ठेवण्याची ‘सुराज्य अभियान’ची परिवहन खात्याकडे मागणी !_प्रतिदिन राज्यभरातून येणार्‍या हजारो वारकर्‍यांची पंढरपुरात लुटमार; ३०-५० रुपयांचे रिक्शा भाडे १५०-२०० रुपयांवर !*

vishwatmaklokswamivarta

गरजुंपर्यंत प्रभावीपणे लाभ पोहोचवावा-केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

vishwatmaklokswamivarta

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा :वडीगोद्री येथे उपोषणकर्त्यांची राज्यशासनाच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

एक सर्वसामान्य व्यक्ती मुख्यमंत्री बनते ही भारतीय लोकशाहीची महानता – राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन

भारतीय जनता पार्टी, जालनाकडून बांग्लादेश व बदलापूर येथील घटनेचा निषेध.*