
भाजपा प्रवक्ते आणि आमदार राम कदम यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा संघटनासोबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या बैठकीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला …
मुंबई प्रतिनिधी भाजपा प्रवक्ते आणि आमदार राम कदम यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा संघटनासोबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या बैठकीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. मुख्यमंत्री पदाचा पदभार शरद पवार यांना दिला का असा सवाल उपस्थितीत केला. काल एसटी कर्मचारी संघटना बैठक शरद पवार आणि परिवहन मंत्री परब यांच्या उपस्थितीत झाली, पवार अशा बैठक कशा धेऊ शकतात तसच सीएम ठाकरे बैठकीस उपस्थितीत नव्हते , ठाकरे यांनी सीएम पदाचा पदभार पवार यांना दिला का असा सवाल त्यांनी उपस्थितीत केला आहे
राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा मुद्दा प्रलंबित आहे. सरकारने घेतलेले निर्णय कर्मचाऱ्यांना मान्य नसल्याने अजूनही काही कर्मचारी कामावर रुजू झालेले नाही. त्याच पार्श्वभूमिवर हा मुद्दा सोडवण्यासाठी शरद पवार यांनी मध्यस्थी करत एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर पुन्हा एकदा कर्माचाऱ्यांना कामावर येण्याचं आवाहन केलं.



