vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

विधानसभा कामकाज : प्रश्नोत्तरे ‘मागेल त्याला शेततळे’ योजना अधिक व्यापक करणार   – मंत्री धनंजय मुंडे

विधानसभा कामकाज : प्रश्नोत्तरे ‘मागेल त्याला शेततळे’ योजना अधिक व्यापक करणार   – मंत्री धनंजय मुंडे

 

 

 

            नागपूर, प्रतिनिधी : ‘मागेल त्याला शेततळे’ ही कृषी विभागाची महत्त्वाकांक्षी योजना असून, अवर्षणग्रस्त भागातील शेतकऱ्यांना याचा अधिक लाभ मिळावा, यादृष्टीने विदर्भ, मराठवाड्यासह कोकणात देखील या योजनेला अधिक व्यापक स्वरूप देण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना दिली.

 

‘मागेल त्याला शेततळे’ योजनेतील प्रलंबित व रद्द झालेल्या अर्जाबाबत लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

 

शेततळे मंजूर करण्याची कार्यवाही जरी कृषी विभाग करत असला, तरी ती राबविण्याची जबाबदारी रोजगार हमी विभाग पार पाडतो, त्यामुळे दोन्ही विभागांचा समन्वय साधून प्रत्येक पात्र लाभार्थ्याला लाभ देण्यासाठी दोन्ही विभागांच्या समन्वयातून अधिक व्यापक स्वरूप दिले जाईल, असेही धनंजय मुंडे याप्रसंगी म्हणाले.

 

कोकण क्षेत्रात जमिनी व भौगोलिक परिस्थिती थोड्या-थोड्या अंतरावर बदलते, त्यामुळे शेततळ्यांना मिळणारा दर व त्यातील दरफरक दूर करण्यासाठी दोन्ही विभाग मिळून मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन समावेशक निर्णय कालबद्ध पद्धतीने घेतला जाईल, असेही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.

 

यावेळी सदस्य बाळासाहेब थोरात, बबनराव लोणीकर, प्रकाश सोळंके, नाना पटोले, ॲड. आशिष शेलार, बबनराव लोणीकर आदींनी या प्रश्नाबाबत चर्चेत सहभाग घेतला.

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय ग्राहक दिन पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न साकार करणारा हावरे प्रॉपर्टीजचा ‘ माय फस्ट होम ‘ गृहप्रकल्प लाँच..

vishwatmaklokswamivarta

दरडोई उत्पन्न वाढीसाठी सूक्ष्म नियोजन करा – खासदार नारायण राणे

vishwatmaklokswamivarta

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडून पद व गोपनीयतेची शपथ

vishwatmaklokswamivarta

अकोला जिल्ह्यात गौण खनिजाची अवैध वाहतूक झाल्याची माहिती प्राप्त झाल्यास पुन्हा चौकशी- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

सहकार व्यवस्थापन पदविकासाठी प्रवेश सुरू

vishwatmaklokswamivarta