vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

आताची मोठी बातमी : लोकसभेतून आणखी 2 खासदार निलंबित, आतापर्यंत सर्वात मोठे  खासदारांचे निलंबन…

आताची मोठी बातमी : लोकसभेतून आणखी 2 खासदार निलंबित, आतापर्यंत सर्वात मोठे  खासदारांचे निलंबन…

 

नवी दिल्ली प्रतिनिधी

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या मिमिक्रीचा मुद्दा केंद्र सरकार व भाजपने उचलून धरला आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना फोन केला आणि खासदारांच्या ‘अशोभनीय वर्तना’वर दु:ख व्यक्त केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सोशल मीडियावर वक्तव्य करत म्हणाल्या, उपराष्ट्रपतींचा अपमान केल्यामुळे मी अत्यंत व्यथित झाले आहे. तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी उपराष्ट्रपती धनखड यांची भेट घेतली व खासदारांच्या वर्तनावर गंभीर चिंता व्यक्त केली.

दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी सांगितले की, विरोधी पक्षाच्या सुमारे १५० खासदारांना संसदेबाहेर केले आहे. मात्र, अदानी मुद्दा, महागाई, बेरोजगारीवर कोणतीच चर्चाहोताना दिसत नाही. चर्चा केवळ आमच्या खासदारांच्या निदर्शनांवर होत आहे. दरम्यान, लोकसभेतून बुधवारीही दोन खासदारांना निलंबित करण्यात आले. केरळ काँग्रेसचे (मणि) थॉमस चंदन आणि माकपचे ए. एम. आरिफ यांच्याविरुद्ध फलक दाखवल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. दोन्ही सभागृहातून आतापर्यंत १४३ खासदारांना निलंबित केले आहे. बुधवारी लोकसभेने दोन विधेयके मंजूर केली. राज्यसभेनेही जीएसटी ट्रिब्यूनलच्या सदस्यांची वयोमर्यादा वाढवण्याचे विधेयक मंजूर केले.

सत्ताधारी : प्रश्नोत्तराच्या तासात समर्थनात १० मिनिटे उभे राहिले

उपराष्ट्रपतींच्या समर्थनात बुधवारी राज्यसभेत प्रश्नोत्तरादरम्यान सत्तापक्षाचे खासदार १० मिनिटे उभे राहिले. धनखड म्हणाले, विरोधकांनी उपराष्ट्रपतिपद, शेतकरी व जातीचा (जाट) अपमान केला

संबंधित पोस्ट

प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन**जिल्ह्याची परंपरा अधिक उज्वल करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे- पालकमंत्री शंभूराज देसाई* 

vishwatmaklokswamivarta

पीएमयू’च्या बैठकीत राज्यातील विकासप्रकल्पांचा आढावा विलंबामुळे प्रकल्पाच्या किंमती वाढतात;नियोजित वेळेत विकासकामे मार्गी लावावी- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांचे फोन डायव्हर्ट, संपर्क करताना अडचणी, दिल्ली पोलीसांनी दिला सल्ला…

राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने महाराष्ट्रात कडक निर्बंध लागण्याची शक्यता .मुंबईत लवकरच लॉकडाऊन? पालिका आयुक्तांची माहिती

*लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा* *सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर*

vishwatmaklokswamivarta

आज जनता दल युनायटेड चे अध्यक्ष नितीश कुमार घेणार राष्ट्रवादी पार्टी अध्यक्ष शरद पवार यांची भेट, ‘या’ मुद्द्यावर करणार चर्चा

vishwatmaklokswamivarta