vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

देशासह राज्याततील अनेक भागात तापमानाचा पारा घसरला थंडी कायम, आणखी वाढ होण्याची शक्यता…

देशासह राज्याततील अनेक भागात तापमानाचा पारा घसरला थंडी कायम, आणखी वाढ होण्याची शक्यता…

 

 

राज्य प्रतिनिधी

राज्यासह देशातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. राज्यात पुढील पाच दिवस कोरडं वातावरण राहणार आहे.

राज्याततील अनेक भागात तापमानाचा पारा घसरला आहे. हवामानातील बदलांमुळे सध्या महाराष्ट्र चांगलाच गारठला आहे. महाराष्ट्रात आठवडाभर कोरडे वातावरण राहणार आहे. तर आणखी आठवडाभर थंडी कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. नाताळच्या वेळी तापमानात किंचित वाढ होणार आहे. मात्र त्यांनतर पुन्हा तापमानात घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे.

देशासह राज्याततील अनेक भागात तापमानाचा पारा घसरला आहे. हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. राज्यातील अनेक भागात सध्या थंडी  वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात आठवडाभर कोरडं वातावरण राहणार आहे. सोमवारपासून राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. मुंबईठाणे, पुण्यासह राज्यात लोक गरम कपडे घालून घराबाहेर पडताना दिसत आहे. नाताळवेळी मात्र राज्यातील तापमान किंचित वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हिंगोली जिल्ह्याच्या तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. हिंगोलीत तापमान 12 ते 13 अंश सेल्सिअस इतक्या प्रमाणात घटल्यामुळे जिल्ह्यात सर्व दूर थंडीची लाट पाहायला मिळत आहे. या काळामध्ये अनेक नागरिक जेथे सकाळी मॉर्निंग वॉक करताना आणि धावताना पाहायला मिळत आहेत, तर जागोजागी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत. नागरिकांनी शेकोट्यांसह उबदार कपडे सुद्धा वापरण्यासाठी काढले आहेत. 

संबंधित पोस्ट

मौजे मेघरे,कारविणे, गालसुर धबधबा व बाणगंगा,सायगांव धरणया पर्यटनस्थळांच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी..

काँग्रेस नेते राहुल गांधींनी घेतली शरद पवारांची भेट, काँग्रेसने आधीच दर्शवला आहे पाठिंबा

महाराष्ट्र सिकलसेलमुक्त करण्यासाठी मिशन मोड काम करण्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

बृहन्मुंबईमध्ये न्यायिक अधिकाऱ्यांसाठी ५१ सदनिका

विधानपरिषद नियम क्रमांक २६० अन्वये चर्चेवर उत्तर-छत्रपती संभाजीनगरच्या वैद्यकीय रुग्णालयासाठी ३४.२८ कोटींचा निधी; औषधांचा तुटवडा नाही· मंत्री माणिकराव कोकाटे यांची विधानपरिषदेत माहिती

मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात ट्रेनर विमान कोसळले; दोन पायलट बेपत्ता