vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने महाराष्ट्रात कडक निर्बंध लागण्याची शक्यता .मुंबईत लवकरच लॉकडाऊन? पालिका आयुक्तांची माहिती

राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने महाराष्ट्रात कडक निर्बंध लागण्याची शक्यता .मुंबईत लवकरच लॉकडाऊन? पालिका आयुक्तांची माहिती

 

राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने महाराष्ट्रात कडक निर्बंध लागण्याची शक्यता आहे. तिसऱ्या लाटेच्या सुरुवातीला मुंबईत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळल्याने दैनंदिन जीवनमानावर त्याचा थेट परिणाम होत आहे. यातच मुंबईत ओमिक्रॉन रुग्णांचाही आकडा वाढला आहे. त्यामुळे लॉकडाऊन लागणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पालिकेचे आयुक्त इकबालसिंग चहल यांनी महत्वाची माहिती दिली आहे

मुंबईत मागील चोवीस तासात 7 हजार 928 रुग्ण आढळले होते. सध्या देशातील सर्वात जास्त रुग्णवाढीचा दर मुंबईत आहे. तर आठवडाभरात यात झपाट्याने वाढही झाली आहे. मागील सात दिवसांत सात पटींने रुग्ण वाढल्याने मुंबईत चिंतेचं वातावरण आहे. पालकमंत्री अस्लम शेख आणि महापौर किशोरी पेडणेकर  यांच्यात बैठक होण्याची शक्यता वाढली आहे. यादरम्यान पालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल  यांनी एका इंगज्री वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुंबईत दररोज 20 हजार रुग्ण आढळल्यास लॉकडाऊन लावावं लागेल, असं म्हटलंय. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. राज्यात एकूण सापडलेल्या ओमिक्रॉन रुग्णांमध्येही सर्वाधिक मुंबईतील आहेत. या पार्श्वभूमिवर मुंबईतील शाळा पुन्हा ऑनलाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिली ते नववी आणि अकरावीचे वर्ग यापुढे ऑनलाईन पद्धतीने भरणार आहेत. फक्त आणि 10 वा आणि 12 वीचे वर्ग सुरू असतील. अशी बातमी सकाळ वर्तमानपत्रातही आली आहे

 

संबंधित पोस्ट

आदिवासी विभागाच्या योजनांमध्ये महिलांना प्राधान्य द्या – मंत्री डॉ. अशोक वुईके

मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

vishwatmaklokswamivarta

विधानपरिषदेला ज्येष्ठ विचारवंत सदस्यांची परंपरा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानपरिषदेतील निवृत्त पाच सदस्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत निरोप

vishwatmaklokswamivarta

निवडणूक निर्णय अधिकारी यांचा नवी मुंबई महानगरपालिकेत विशेष प्रशिक्षण कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील मोठी दुर्दैवी बातमी- गेटवे ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटली; एकाचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता…

vishwatmaklokswamivarta

चिपी – मुंबई विमानसेवा तातडीने सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta