vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

चिपी – मुंबई विमानसेवा तातडीने सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

चिपी – मुंबई विमानसेवा तातडीने सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई, प्रतिनिधी:  – चिपी विमानसेवा सुरू करण्यासाठीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. ही विमानसेवा सुरू करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असून यासाठी शासनाने ‘उडान’च्या धर्तीवर ‘आरसीएस’ फंडिंगचा निर्णय घेतला आहे. ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

  मंत्रालयात चिपी – मुंबई विमानसेवा विषयी बैठक झाली. त्यावेळी मंत्री श्री. राणे बोलत होते. बैठकीस विमानतळ प्राधिकरण आणि विमानतळ ऑपरेटर कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

  चिपी – मुंबई विमानसेवा सुरू होणे ही सिंधुदुर्गसाठी भावनिक बाब असल्याचे सांगून मंत्री श्री. राणे म्हणाले की, या विमानतळासाठीच्या पायाभूत सुविधाही लवकरात लवकर पूर्ण कराव्यात. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्याने चिपी विमानतळास वेगळे महत्व आहे. चिपी – मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या एक महिन्यात घेण्यात याव्यात. विमानतळ प्राधिकरण आणि विमानतळ ऑपरेटर कंपनी यांनी समन्वयाने काम करावे. भविष्यात या विमानतळाला मोठे महत्त्व येणार असल्याने यासंदर्भातील कामे प्राधान्याने करावीत, असे निर्देशही मंत्री श्री. राणे यांनी दिले.

0000

संबंधित पोस्ट

युवा पिढीला एआय बेस तंत्रज्ञानाद्वारे पुढे नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार -महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे ‘अमरावती युवा महोत्सव 2026’चे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटनमेळघाट महोत्सवाच्या माध्यमातून युवकांना संधी..

राजूर येथील कावीळ साथ रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

पुणे–बंगळुरु महामार्गावर अति भीषण अपघात: सात जणांचा मृत्यू…. तीन वाहने जळून खाक…

vishwatmaklokswamivarta

रस्त्याचे काम अर्धवट; गणेश वाडेकर ठेकेदाराने बिलही उचलले माजी सरपंच विमल सातपुते यांच्या कार्यकाळात २०२३ ला झालेला रस्ता फक्त १० तास जेसीबी चालवून अर्धवट काम करुन ८ लाखाचे बोगस बिल उचलले तरीही यावर कारवाई होईल का?हस्ते पिंपळगाव येथील ग्रामस्थांनी गाठले थेट मिनी मंत्रालय.

जिगाव प्रकल्प : पुनर्वसित गावांमध्ये नागरी सुविधा प्राधान्याने द्या- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

भारताने जगाला दिलेले आरोग्याचे अनमोल वरदान म्हणजे योग – केंद्रीय बंदरे मंत्री सर्बानंद सोनोवाल मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या वतीने ‘गेटवे ऑफ इंडिया’ येथे योगाभ्यास कार्यक्रम