vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पूर्वपरवानगीशिवाय ड्रोन, क्षेपणास्त्र, पॅराग्लायडर्स, मायक्रो लाईट एअर क्राफ्टच्या उड्डाणास पोलीस आयुक्तालय हद्दीत बंदी..

 

 

 

ठाणे, प्रतिनिधी  : पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी व मानवी जीवनाच्या सुरक्षिततेला व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होण्याचा गंभीर धोका निर्माण होऊ नये, यासाठी सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पूर्वपरवानगीशिवाय रिमोटद्वारे कंट्रोल होणारे ड्रोन, नियंत्रित क्षेपणास्त्र, पॅराग्लायडर्स किंवा मायक्रो लाईट एअर क्राफ्ट यांच्या उड्डाणास दि.14 जानेवारी 2024 रोजी रात्री 12.01 वाजल्यापासून ते 13 मार्च 2024 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत या 60 दिवसांच्या कालावधीत बंदी घालण्यात आली असल्याची माहिती ठाणे शहर विशेष शाखा पोलीस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांनी दिली आहे.

 

त्यांच्या आदेशानुसार सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय रिमोटद्वारे कंट्रोल होणारे ड्रोन, नियंत्रित क्षेपणास्त्र, पॅराग्लायडर्स किंवा मायक्रो लाईट एअर क्राफ्ट यांच्या उड्डाणास 60 दिवसांसाठी प्रतिबंध करण्यात आला आहे. परंतु रिमोट कंट्रोल मायक्रो लाईट एअरक्राफ्ट ड्रोनद्वारे हवाई निगराणी करण्यास ठाणे शहर पोलिसांना परवानगी देण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असेही या आदेशात नमूद केले आहे.

 

000000

संबंधित पोस्ट

सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा-2024 सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्स मंडळासाठी पाच लक्ष रुपयांचे पहिले पारितोषिक

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील ११ गड किल्ल्यांचा युनेस्कोकडे नामांकनासाठी प्रस्ताव गड किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता त्यावर अंतिम मोहोरही उमटेल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्याच्या प्रॉपर्टीवर ईडीची कारवाई…

✨🎬 गणेशोत्सव 2025 निमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची रील स्पर्धा 🎬✨

स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्याच्या यशस्वीतेसाठी राज्य शासन कटिबद्ध- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही· केंद्रीय शहरी विकास मंत्र्यांनी राज्यांकडून घेतला स्वच्छताविषयक उपक्रमांचा आढावा…