vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

तिबेटीयन जनतेला न्यायासाठी भारतासह बौद्ध राष्ट्रे,आंतरराष्ट्रीय राष्ट्रांचा हवाय पाठिंबा..

 तिबेटीयन जनतेला न्यायासाठी भारतासह बौद्ध राष्ट्रे,आंतरराष्ट्रीय राष्ट्रांचा हवाय पाठिंबा..

 

[ सुरेश गायकवाड याच कडून

मुंबई प्रतिनिधी: मुंबई- चीन देशाच्या दहशतीखाली तिबेटीयीन जनता क्षणोक्षणी मरण यातना भोगते आहे. त्यांचे जीवन नरकयातना अनुभवतोय अशी भयावह स्थिती असताना न्यायासाठी भारतासह बौद्ध राष्ट्रे, आंतरराष्ट्रीय राष्ट्रांनी पाठिंबा दयावा यासाठी तिबेटीयन प्रतिनिधीनी आयोजित केलेल्या मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

[: तिबेट हा भारताचाच अविभाज्य भाग आहे. हया भागावर चीनने अतिक्रमण करून येथील जनतेला मरण यातना भोगावयास लावल्या आहेत. त्यामुळे येथील १५७ जणांनी आत्मदहन केले आहे. तसेच येथील जनता अत्यंत मरणासम आयुष्य जगते आहे. त्यांना जोखडाखाली ठेवण्यासाठी जागोजागी १०० हून अधिक सीसीटिव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यांना पुरते गुलाम करून ठेवले आहे. ते अत्यंत क्षुद्रपणाचे आयुष्य जगत असल्याचे त्यांनी सांगितले.

 तिबेटयीन जनतेचा आवाज सर्व राष्ट्रांना कळण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकाऱ्यांनी पुढाकार घेऊन चीनच्या दहशतीला चाप लावावा असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

[ तिबेटीयन जनतेच्या न्याय हक्कांसाठी मंत्रीमहोदय दिलीप वळसे पाटील, अजीत पवार,देवेंद्र फडणवीस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना भेटून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची ही भेट घेणार असल्याचे सांगितले. इतकेच नव्हें तर सिद्धार्थ कॉलेज च्या विद्यार्थ्यांशी, एनजीओच्या पदाधिकाऱ्याशी भेटून चची केली असल्याचे ही त्यांनी सांगितले.

: या वेळेस पत्रकार परिषदेमध्ये तिबेटियन जनतेचे दुःख जगाला कळावे आणि त्यांना वाचविण्यासाठी भारताने पुढाकार घ्यावा त्यासाठी उपस्थित असलेले खासदार अनद्रूक तत्सेन , तेसरींग यांगचेन, धोन्डप ताशी सोबत अनुवाद जिग्मे यांनी केले.

संबंधित पोस्ट

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या डिजिटल डॅशबोर्डचे मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

लाडकी बहिण योजनेच्या लाभातून महिलांनी स्वयंपूर्ण व्हावे-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील*मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा शुभारंभ

जनसुरक्षा विधेयकाने देशविघातक संघटनाच्या मुसक्या आवळणार – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

वारली चित्रकारांच्या रंगछटातून हवामान बदलासंबंधी जनजागृती…प्रोजेक्ट धरित्री’ अंतर्गत वारली चित्रकलेने बोलू लागल्या शाळेच्या भिंती…

vishwatmaklokswamivarta

36104 नवी मुंबईकर विद्यार्थ्यांनी घेतला सन 2024-25 वर्षात शिष्यवृत्तीचा लाभ..           

राज्यातील जनतेला सर्वाधिक ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देणारा हा #महसूलविभाग.