vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

छत्रपतींचे कधीच नाव घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला- राज ठाकरे अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना

छत्रपतींचे कधीच नाव घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला- राज ठाकरे अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना

 

राज्य प्रतिनिधी: छत्रपतींचे कधीच नाव घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शरद पवारांवर केली. तुम्ही शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेता पण छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कधी घेत नाही, असा प्रश्न मी त्यांना विचारला होता. छत्रपतींचे नाव घेतल्यास मुसलमानांची मतं मिळत नाहीत, असे म्हणत त्यांनी पवारांवर टिका केली. शरद पावर यांना तुतारी निशाणी मिळाला आहे तर फुका..महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चिखल झालाय अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

 

राजकारणाचा चिखल करणाऱ्यांना लोकांनी यांना वठणीवर आणलं पाहिजे. लोकांनी वठणीवर आणलं नाहीतर राजकारणाचा आणखी चिखल होईल..नुसतं नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हाव हे वाटणं हे ठीक आहे. पण खालच्या पातळीवर विचित्र राजकारण सुरु आहे. ज्या तरुणांना राजकारणात यायचंय त्यांना हा आदर्श देणार आहोत का? महाराष्ट्रातील जनतेने सर्वांना वठणीवर आणलं तर ठीक आहे नाहीतर महाराष्ट्राच काही खर नाही, असे ते म्हणाले. अशा प्रकार चा वातावरणं मी केव्हा पाहिलं नाही आणि लोकांनी ही पाहिलं नाही, असे ते म्हणाले.

 

 

चिन्हाचं वेगळं समीकरण पाहायला मिळतंय, यावर त्यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. दरम्यान ही चांगली चिन्ह नव्हेत, असे त्यांनी म्हटले. महाराष्ट्र मध्ये दुष्काळ ची परिस्थिती आहे बेरोजगार आहे. राज्या राज्यामध्ये राष्ट्रीय पक्षांची गरज नसते. इथले प्रश्न सोडवायला राज्यातील पक्ष असतात. असेही ते यावेळी म्हणाले.

 

मराठा आरक्षणासंदर्भातदेखील मी आधीच बोललो होतो. मी विचार करुनच बोलत असतो. त्याचे परिणाम आधीच सांगत असतो. त्यावेळी लोकांना पटत नाही पण कालांतराने कळतात.महाराष्ट्र श्रीमंत राज्य आहे. त्याला विस्कळीत करणं हे अनेकांच ध्येय असेल आणि त्याला बाकीचे त्याला बळी पडत असतील तर हे दुर्देव असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

संबंधित पोस्ट

एचएसएनसी’ समूह विद्यापीठाचा दुसरा पदवीप्रदान समारंभ विद्यार्थ्यांनी उद्योजक बनून विकसित भारत निर्माण प्रक्रियेत योगदान द्यावे- राज्यपाल रमेश बैस

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्र्यांच्या सात कलमी कृती कार्यक्रमाची-अंमलबजावणी करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे निर्देश

सनातन संस्थेच्या वतीने ‘हिंदु राष्ट्ररत्न’ व ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार !हिंदु राष्ट्ररत्न : अधिवक्ता (पू.) हरि शंकर जैन;  सनातन धर्मश्री : मंत्री कपिल मिश्रा, चित्रपट निर्माते विपुल शहा, अधिवक्ता संजीव पुनाळेकर, गौरीशंकर मोहता, शिल्पकार प्रमोद कांबळे

ऑपरेशन सिंदूर हे तिन्ही सेनादलांमधील समन्वय आणि कार्यान्वयन एकात्मकतेचे प्रतीक आहे: संरक्षण दल प्रमुख

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात बीएसयूपी सदनिकांमध्ये घर घेणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना एक टक्के मुद्रांक शुल्क अधिभारात सवलत – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे विभागातील ६३४३ गरीब कुटुंबांना होणार लाभ

vishwatmaklokswamivarta

माझ्या मुलांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा एम आय डिसी कारेगाव पोलिसांचा डाव, आझाद मैदानात उपोषण 

vishwatmaklokswamivarta