vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

महिला दिनी लेक लाडकी अभियानाचा शुभारंभ

महिला दिनी लेक लाडकी अभियानाचा शुभारंभ

 

बुलडाणा, प्रतिनिधी: जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त लेक लाडकी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी, विशाल नरवाडे यांच्या हस्ते फीत कापून अभियानाची सुरुवात करण्यात आले.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद ऐंडोले, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत, सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. पिंपळे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात लेक लाडकी योजनेच्या बॅनरचे श्री. नरवाडे यांचे हस्ते फीत कापून शुभारंभ करण्यात आले. तसेच महिलांच्या मोटर सायकल रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. ही रॅली जिल्हा परिषदेच्या गेट पासून सुरुवात होऊन जय स्तंभ चौक, कारंजा चौक, भोडे चौक, तहसिल कार्यालय, संगम चौक, जय स्तंभ चौक या मार्गाने निघून परत जिल्हा परिषद येथे रॅलीची सांगता झाली. रॅलीमध्ये लेक लाडकी योजनेची प्रचार व प्रसिध्दी करण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांनी फलकातून संदेश दिला.

00000

 

संबंधित पोस्ट

एक दिवा सैनिकांसाठी – दिवाळी सकाळ सैनिकांच्या परिवारासोबत उपक्रम उत्साहात..

vishwatmaklokswamivarta

भजन, कीर्तन राज्याच्या संस्कृतीचा कणा – मंत्री ॲड. आशिष शेलार कव्वाली महोत्सवाचे उद्घाटन

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

सहकार बँक कॉलनीत अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा शुक्रवारपासून!

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान इंटर्नशिप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सांगली पाटबंधारे विभागात पूर नियंत्रण कक्ष कार्यान्वित