vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्मप्रदेश

सहकार बँक कॉलनीत अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा शुक्रवारपासून!

सहकार बँक कॉलनीत अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा शुक्रवारपासून!

जालना प्रतिनिधी: येथील सहकार बँक कॉलनीतील गजानन महाराज मंदिरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प. पू. भगवान महाराज आनंदगडकर यांच्या कृपाशिर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह, भागवत कथा व विजय ग्रंथ पारायण सोहळ्यास येत्या शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे.
यां सप्ताहात शुक्रवार दि. 14 फेब्रुवारी रोजी हभप भगवान महाराज सावंत तर शनिवार दि.15 फेब्रुवारी दिनेश महाराज उंडे (देवाची आळंदी), रविवार दि. 16 फेब्रुवारी रोजी हभप सोनवणे महाराज गुरुजी, सोमवार दि. 17 फेब्रुवारी रोजी राजेद्र महाराज वाघमारे आणि मंगळवार दि. 18 फेब्रुवारी रोजी हभप श्रीहरी रसाळ महाराज तर बुधवार दि. 19 फेब्रुवारी रोजी हभप प्रा. उध्दव महाराज राऊत (आळंदी), गुरुवार दि. 20 फेब्रुवारी रोजी हभप त्रिंबक महाराज दस्तापुरकर यांचे हरिकिर्तन होणार असून शुक्रवार दि. 21 फेब्रुवारी रोजी ंंहभप डॉ. भगवान बाबा आनंदगडकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. तर याच दिवशी तत्पूर्वी श्री. गजानन महाराज पालखी मिरवणूक (दिंडी) सोहळा होणार आहे.
यानिमित्त भरगच्च धार्मिक कार्यक्रम होणार असून दररोज सकाळी काकडा भजन, विष्णू सहस्त्रनाम, श्री. गजानन विजय ग्रंथ पारायण, त्यानंतर गाथा भजन तर दुपारी 1 ते 5 यावेळेत श्री. भागवत कथा होणार आहे. तर सायंकाळी हरिपाठ व रात्री 9 ते 11 यावेळेत हरिकिर्तन व त्यानंतर हरीजागर होणार आहे. तत्पूर्वी भागवत पुजन व समाप्ती महाआरती सौ. व श्री. सिमा शामराव भांदरगे यांच्या हस्ते होणार आहे. तर प्रगट दिनाचा महाप्रसादाचे मुख्य यजमान सौ. व श्री. सरिता दत्तात्रय शेजुळ हे राहणार असून भजनी मंडळ आणि किर्तन सेवेस साथ देणार आहेत मृदंगाचार्य हभप भगवान म. जाधव व तुकाराम म. मुढे, गायनाचार्य हभप हभप विष्णू म. सावंत हे ज्ञानेश्वर म. जोशी, भगवान म. लकडे, गिरी महाराज, रमेश प. पवार, यादव म. जाधव, उध्दव म. राठोड तर हरिपाठाचे नेतृत्व हभप विष्णू म. सावंत हे करणार आहे. या सर्व धार्मिक कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. गजानन महाराज विश्वस्त मंडळाचे सचिव श्री. सपंतराव पाटील व समस्त विश्वस्तांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

भिम पदयात्रेद्वारे आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीच्या कामकाजासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत तालुकानिहाय शिशिबीर

vishwatmaklokswamivarta

बुलडाणा जिल्हा सहकारी बँकेमार्फत नाविन्यपूर्ण व्याज सवलत योजना;शेतकरी, व्यावसायिक व थकीत कर्जदार सभासदांनी योजनेचा लाभ घ्यावा

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घ्या – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख-वीरशैव आणि लिंगायत एकच : जगद्गुरू पंचाचार्य —

जनगणना प्रक्रियेत प्रत्येक अधिकारी- कर्मच्याऱ्यांनी आपली जबाबदारी अचूकपणे पार पाडावी-जिल्हाधिकारी राहुल कर्डीले जनगणना २०२७ प्रशिक्षण कार्यशाळेस सुरुवात; नागरिकांना स्व-गणनेची सुविधा