vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

निवडणूक प्रक्रियेत सूक्ष्म निरीक्षक यांची भूमिका अतिशय महत्वपूर्ण

निवडणूक प्रक्रियेत सूक्ष्म निरीक्षक यांची भूमिका अतिशय महत्वपूर्ण

 

 

 

रायगड प्रतिनिधी सार्वत्रिक लोकसभा निवडणूकी मध्ये निवडणूक सूक्ष्म निरीक्षक (मायक्रो आब्जव्हर्स) यांची भूमिका अतिशय महत्वपूर्ण आहे.त्यामुळे त्यांनी आपली जबाबदारी नि:पक्षपातीपणे पार पाडावी, असे निर्देश 32 रायगड लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक संजीवकुमार झा यांनी दिले.

 

रायगड लोकसभा मतदार संघात निवडणूक प्रक्रिया सुरळीत पणे पार पडावी, यासाठी सूक्ष्म निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अनुषंगाने आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

 

यावेळी व्यासपीठावर अपर जिल्हाधिकारी डॉ.ज्योस्त्ना पडियार,उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा उबाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे, परिविक्षाधिन उपजिल्हाधिकारी दुर्गा देवरे आदी उपस्थित होते.

 

यावेळी निवडणूक निरीक्षक झा म्हणाले, नि:पक्ष आणि मोकळया वातावरणात होणाऱ्या निवडणूकीचे सूक्ष्म निरीक्षक हे साक्षीदार आहेत. त्यांच्यावर जिल्हा प्रशासनाचे नियंत्रण नसून ते निवडणूक निरीक्षक आणि आयोगास उत्तरदायी आहेत. मतदान केंद्रावर तसेच गृह मतदानाच्या वेळी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडावी, असे श्री. झा यांनी यावेळी सांगितले

 

यावेळी अपर जिल्हाधिकारी श्रीमती पडियार यांनी सूक्ष्म निरीक्षक कार्य व कर्तव्य याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

संबंधित पोस्ट

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने लेख ……गुरुपौर्णिमेचे महत्त्व ‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्‍वरः । गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥

राज्यातील पहिला अभिवंदन सोहळा-मराठी भाषा संवर्धनासाठी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा- ना.उदय सामंत

vishwatmaklokswamivarta

रेल्वेचे विशेष बातमी ,पुणे-नाशिककडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचा खोळंबा, कल्याणजवळ रेल्वे रुळाला तडा

vishwatmaklokswamivarta

अहमदनगर-कल्याण महामार्गावर  ट्रक, पिकअप टेम्पो आणि रिक्षा यांची धडक, अपघातात आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या अपघाताबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले

vishwatmaklokswamivarta

वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन,शेतकऱ्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी सर्व विभागांचा समन्वय आवश्यक- ॲड. निलेश हेलोंडे पाटील

vishwatmaklokswamivarta

राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर ५ फेब्रुवारीला मतदान; ७ फेब्रुवारीला मतमोजणी – राज्य निवडणूक आयुक्त

vishwatmaklokswamivarta