vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

विभागीय आयुक्तांकडून महाराष्ट्र दिन पुर्वतयारीबाबतचा आढावा

विभागीय आयुक्तांकडून महाराष्ट्र दिन पुर्वतयारीबाबतचा आढावा

 

छत्रपती संभाजीनगर,  :- महाराष्ट्र दिनानिमित्त 1 मे रोजी देवगिरी मैदान, पोलीस आयुक्त कार्यालय येथे ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सबंधित विभागाने आपल्याला सोपवलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी समन्वयाने कामकाज करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांनी आज दिल्या.

 

विभागीय आयुक्त कार्यालयात महाराष्ट्र दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमाच्या पुर्वतयारीची बैठक विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या आयोजनाबाबतची सविस्तर चर्चा झाली.

 

बैठकीच्या प्रारंभी उपायुक्त जगदिश मिनीयार यांनी कार्यक्रमाच्या कामकाजाबाबत विभागनिहाय माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, मनपाचे उपायुक्त रणजित पाटील यांच्यासह पोलीस आयुक्त कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका, प्रादेशिक परिवहन विभाग यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

00000

संबंधित पोस्ट

छत्रपती महाराणी ताराबाई यांचे कार्य सर्वदूर जाण्यासाठी लेखणीची गरज – श्रीमंत शाहू महाराज छत्रपती सांस्कृतिक कार्य विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या महाराणी ताराबाई यांच्या जीवनावर आधारित विशेष चित्ररथाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

डॉ. संजय मुन हे फुले – आंबेडकरी चळवळीचे प्रभावी प्रसारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नात रमा यशवंतराव आंबेडकर यांचे गौरोद्गार : डॉ. संजय मुन यांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

घर घर संविधानराज्यघटनेचा अभिमान प्रत्येकाने बाळगावा- पालकमंत्री संजय शिरसाट

पी.एम.किसान “एपीके” लिंक उघडताच शेतकऱ्यांची बैंक खाती होताहेत रिकामी-फसव्या पीएम किसान ॲप्लीकेशन, लिंकपासून सावध रहा

महाराष्ट्र परिचय केंद्र येथे मराठी पत्रकार दिन

वारणा धरणात 19.90 टी.एम.सी. पाणीसाठा