vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मेट्रो डेपो हलवण्याचे काम सुरू आम आदमी पार्टी मुंबई प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रणाली गिरीश राऊत यांनी मानले प्रशासनाचे आभार..

मेट्रो डेपो हलवण्याचे काम सुरू आम आदमी पार्टी मुंबई प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रणाली गिरीश राऊत यांनी मानले प्रशासनाचे आभार..

 

मुंबई प्रतिनिधी

माहीम पश्चिम येथील भागोजी कीर मार्गावरील एडवोकेट. देसाई मैदानात गेली आठ वर्षे मेट्रो ३ भूयारी रेल्वेच्या शीतलादेवी स्थानकाचे गोदाम (डेपो) आहे. इतका काळ हे क्रिडांगण खेळासाठी उपलब्ध नाही. त्यामुळे बालके, तरूण व ज्येष्ठ नागरिकांंचे न भरून येणारे नुकसान झाले आहे व आजही होत आहे. याबाबत एम एम आर सी एल कडे दि. १७ नोव्हेंबर २०२३ रोजी पत्र दिले होते.

मधील काळात मैदान मोकळे होईल अशी अपेक्षा होती. परंतु तसे झाले नाही. मी माहीममधील रहिवाशांची स्वाक्षरी मोहीम घेतली आणि दि. ३० एप्रिल २०२४ रोजी नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांसह पत्र मेट्रो कडे दिले. नंतर मेट्रोचे नियोजन अधिकारी आर रमणा यांची भेट घेतली. मैदान खेळासाठी उपलब्ध नसल्याने मुले व तरूणांच्या ऊर्जेला विधायक पध्दतीने वाट मिळत नाही, त्याचा परिणाम म्हणून तरूणांमधे व्यसनांचे प्रमाण वाढत आहे व इतर समस्या तयार होत आहेत. विभागातील शाळांच्या क्रीडा स्पर्धा या मैदानात होत असत. त्या आता होत नाहीत. वाहतुकीच्या प्रकल्पाचा असा समाजिक दुष्परिणाम होत आहे याकडे मी, रमणा यांचे लक्ष वेधले.

 

सीतलादेवी स्थानकाचे काम पूर्ण होण्यावर मैदान उपलब्ध होणे अवलंबून ठेवू नये, नागरिकांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी डेपो लवकरात लवकर इतर ठिकाणी हलवावा, अशी मागणी केली. श्री. रमणा यांनी ही गोष्ट लक्षपूर्वक समजुन घेतली. त्यांनी मैदानातील डेपो हलवुन जून २०२४ पर्यंत मैदान पूर्ववत मातीच्या स्वरूपात उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले आहे.

आज पर्यंत या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने लक्ष दिले नव्हते. मात्र प्रशासनाला स्वाक्षऱ्यांसह लेखी निवेदन दिल्यानंतर मेट्रो डेपो हलवण्याचे काम सुरू झाले आहे. आम आदमी पार्टी मुंबई प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रणाली गिरीश राऊत यांनी याबद्दल प्रशासनाचे आभार मानले आहेत.

 

यापूर्वी एडवोकेट देसाई मैदानावर एस आर ए योजना येत होती. एडवोकेट गिरीश राऊत यांनी नागरिकांच्या सहकार्याने प्रशासनाकडे हा प्रश्न लावुन धरल्यामुळे आयुक्तांनी ही योजना रद्द केली व मैदान वाचले.*क्रिडांगणे वाचवणे म्हणजे पुढील पिढ्यांचे भविष्य वाचवणे आहे, असे प्रणाली राऊत म्हणाल्या.*

संबंधित पोस्ट

अनुदानित खतांची विक्री ई-पॉस प्रणालीद्वारे करणे बंधनकारक;२६ कृषी सेवा केंद्रांवर कारवाई; विक्री व साठ्यात आढळली तफावत

vishwatmaklokswamivarta

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना;कन्नड तालुक्यात ६० लाभार्थ्यांना ९१ हे.जमिनीचे वाटप..

विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून विकासाचे नियोजन करणार – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा सामाजिक न्याय दिन साजरा घर घर संविधान योजनेचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

पालघरकर महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांना विक्रमी मताने विजयी करतील हा ठाम विश्वास… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुती च्या भव्य प्रचार सभेत व्यक्त केला

vishwatmaklokswamivarta

भेसळयुक्त खाद्यतेलाचा ४२ हजार २९४ किलो साठा जप्त;अन्न व औषध प्रशासन विभागाची ऑगस्टपासूनची कारवाई

vishwatmaklokswamivarta

हलाल सर्टिफिकेश संदर्भात कठोर नियम आवश्यक : सर्टिफिकेशन केवळ मांसाहारी खाद्य पदार्थांपुरते मर्यादित ठेवावे, सरकारी संस्थांनाच सर्टिफिकेशनचे अधिकार असावे ! 

vishwatmaklokswamivarta