vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

सैनिकी वसतिगृहातील उपहारगृहासाठी प्रस्ताव आमंत्रित

सैनिकी वसतिगृहातील उपहारगृहासाठी प्रस्ताव आमंत्रित

 

बुलडाणा,  : चिखली रस्त्यावरील सैनिकी मुलांच्या वसतिगृहातील भोजन कक्ष उपहार गृहासाठी भाडेतत्वावर देण्यात येणार आहे. यासाठी प्रस्ताव आमंत्रित करण्यात आले आहे.

 

चिखली रोडवरील लक्ष्मी माता मंदिराजवळ सैनिकी मुलांचे वसतिगृह आहे. याठिकाणी माजी सैनिकांच्या उपचाराकरीता इसीएचएस कार्यान्वित आहे. इसीएचएसमध्ये दररोज सुमारे 150 माजी सैनिक, माजी सैनिक विधवा तसेच त्यांचे अवलंबित उपचार व योजनेचा लाभ घेण्यासाठी येतात. सैनिकी मुलांच्या वसतिगृहाजवळ 1 किलोमीटर अंतराच्या आत अल्पोपहाराकरीता कोणतेही उपहारगृह उपलब्ध नाही. त्यामुळे वसतिगृहातील भोजनकक्ष भाडेतत्वावर देण्यासाठी जिल्ह्यातील इच्छुक माजी सैनिक, माजी सैनिक महिला बचतगट, माजी सैनिक विधवा आणि इतर नागरिकांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

 

भोजनकक्ष भाडेतत्वावर देण्यासाठी माजी सैनिक महिला बचत गट, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, इतर नागरीक असा प्राधान्यक्रम राहणार आहे. त्यामुळे अर्जदारांनी आपले अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलडाणा येथे दि. 20 जून 2024 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

पुसापती अशोक गजपती राजू यांनी गोव्याच्या राज्यपालपदाची घेतली शपथ

कौशल्य विकास केंद्राचा मंगळवारी रोजगार मेळावा

सकलेचा नगरवासीयांची नागरी समस्यांपासून होणार मुक्तता, भास्कर आबा दानवे यांच्या पुढाकाराने कामांना सुरुवात…

vishwatmaklokswamivarta

आठवी आर्थिक गणना; प्रशासनाची पूर्वतयारी सुरु

vishwatmaklokswamivarta

सहकारी बँकेमुळे स्थानिक भांडवल निर्मिती व विकास साध्य-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राजपत्रित नागरी संयुक्त पुर्व परीक्षा 2025 साठीपरीक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी…

vishwatmaklokswamivarta