vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

महाराष्ट्र राजपत्रित नागरी संयुक्त पुर्व परीक्षा 2025 साठीपरीक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी…

महाराष्ट्र राजपत्रित नागरी संयुक्त पुर्व परीक्षा 2025 साठीपरीक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी…

        जालना प्रतिनिधी: महाराष्ट्र राजपत्रित नागर संयुक्त पुर्व परीक्षा 2025 ही दि. 28 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10.00 ते 12.00 व दुपारी 3.00 ते 6.00 या वेळेत जालना जिल्ह्याच्या बद्रीनारायण बारवाले कॉलेज एमआयडीसीजवळ औरंगाबाद रोड, जालना. मत्सोदरी शिक्षण संस्था अंकुशराव टोपे कॉलेज, मोतीबाग ओव्हरब्रीज जवळ जालना. राष्ट्रीय हिंदी विद्यालय, देऊळगावराजा रोड, जालना. श्री. एम.एस. जैन विद्यालय (मराठी मिडियम), गणेश नगर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, जालना या 4 केंद्रावर घेण्यात येणार असुन अपर जिल्हादंडाधिकारी यांच्या भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये परीक्षा उपकेंद्राच्या 200 मीटर परिसरात परीक्षेच्या दिवशी सर्व सार्वजनिक टेलिफोन/ एसटीडी बुथ/फॅक्स/झेरॉक्स व ध्वनीक्षेपके बंद ठेवण्याचे प्रतिबंधात्मक आदेश लागु केले आहे. हा आदेश दि. 28 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 8.00 वाजेपासून सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत लागु राहतील असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी गणेश महाडिक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिले आहेत.

-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

जरंडेश्वर उपकेंद्रातून 33 केव्ही नेर उपसा सिंचन योजनेवरील वाहिनी आज होणार कार्यान्वित नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे महावितरणचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

राजधानीत मराठी भाषा – संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध – मंत्री उदय सामंत दिल्ली व परिसरातील विविध मराठी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक

vishwatmaklokswamivarta

जळगाव जामोद तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; २८ एप्रिलला होणार मतदान..

विभागीय आयुक्त दिलीप गावडे साधणार नागरिकांशी ऑनलाइन वेबिनारद्वारे संवाद- 11 एप्रिल रोजी दुपारी 4 ते 6 या वेळेत ‘संवाद मराठवाडयाशी’उपक्रमØ आठही जिल्हयातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन…

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र” योजनेंतर्गत इच्छुक संस्थांना प्रस्ताव सादर करण्याची 10 एप्रिल पर्यंत मुदत…

पद्मश्री किसनराव बाबुराव हजारे (अण्णा) यांनी राळेगणसिद्धी येथे स्वगणना प्रक्रिया पूर्ण करून नागरिकांना सहभागाचे आवाहन केले