
पुणे जिल्ह्यातील मंचर येथे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याने दोघांना चिरडले, पुणे येथे भीषण अपघात…
राज्य प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याने भरधाव कार चालवत दुचाकीला धडक दिली. यात एका तरुणाचा मृत्यू झाला. बेदरकारपणे गाडी चालवून दोघांना गाडीखाली चिरडल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे हा तरुण पुण्यातील आमदाराचा पुतण्या आहे.
पुणे जिल्हा पुन्हा एकदा भीषण अपघाताने (Pune Accident) हादरला आहे. या अपघातात कारने दोघांना चिरडल्याचे वृत्त असून, एकाचा मृत्यू आणि दुसरा गंभीर जखमी झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुण्यातील खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याच्या कारने या दोघांना चिडल्याचे समजते. मयुर मोहिते पाटील असे त्याचे नाव आहे. हा अपघात पुणे-नाशिक महामार्गावर रात्री घडला. अपघातामुळे परिसरातील नागरिक घटनास्थळी जमले. बराच काळ घटनास्थळवरील वातावरण तणावाचे होते. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली.
दरम्यान, पुणे पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून शनिवारी रात्री या प्रकरणी उशीरपर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. मयुर मोहिते असे कार चालकाचे नाव आहे. जो आमदाराचा पुतण्या आहे. तर ओम भालेराव (वय-19) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो दुचाकी चालवत होता. त्याच्या दुचाकाकीला मयुर याच्या कारने धडक दिली.
अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनीच या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी प्राप्त माहितीनुसार घटनास्थळ गाठले आणि मदत व बचाव कार्य सुरु केले. रात्री उशीरपर्यंत मंजर पोलीस स्टेशनमध्येय गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. दरम्यान, अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाच्या नातेवाीकांनी पोलीस स्टेशनबाहेर मोठी गर्दी केली होती. जमाव प्रचंड चिडला होता. पोलिसांनी सर्वांना शांततेचे अवाहन केले



