vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पुणे जिल्ह्यातील मंचर येथे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याने दोघांना चिरडले, पुणे येथे भीषण अपघात…

पुणे जिल्ह्यातील मंचर येथे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याने दोघांना चिरडले, पुणे येथे भीषण अपघात…

राज्य प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याने भरधाव कार चालवत दुचाकीला धडक दिली. यात एका तरुणाचा मृत्यू झाला. बेदरकारपणे गाडी चालवून दोघांना गाडीखाली चिरडल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे हा तरुण पुण्यातील आमदाराचा पुतण्या आहे.

पुणे जिल्हा पुन्हा एकदा भीषण अपघाताने (Pune Accident) हादरला आहे. या अपघातात कारने दोघांना चिरडल्याचे वृत्त असून, एकाचा मृत्यू आणि दुसरा गंभीर जखमी झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुण्यातील खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याच्या कारने या दोघांना चिडल्याचे समजते. मयुर मोहिते पाटील असे त्याचे नाव आहे. हा अपघात पुणे-नाशिक महामार्गावर  रात्री घडला. अपघातामुळे परिसरातील नागरिक घटनास्थळी जमले. बराच काळ घटनास्थळवरील वातावरण तणावाचे होते. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली.

 

दरम्यान, पुणे पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून शनिवारी रात्री या प्रकरणी उशीरपर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. मयुर मोहिते असे कार चालकाचे नाव आहे. जो आमदाराचा पुतण्या आहे. तर ओम भालेराव (वय-19) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो दुचाकी चालवत होता. त्याच्या दुचाकाकीला मयुर याच्या कारने धडक दिली.

अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनीच या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी प्राप्त माहितीनुसार घटनास्थळ गाठले आणि मदत व बचाव कार्य सुरु केले. रात्री उशीरपर्यंत मंजर पोलीस स्टेशनमध्येय गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. दरम्यान, अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाच्या नातेवाीकांनी पोलीस स्टेशनबाहेर मोठी गर्दी केली होती. जमाव प्रचंड चिडला होता. पोलिसांनी सर्वांना शांततेचे अवाहन केले

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र व गुजरात देशाच्या विकास आणि जागतिक पटलावर नाव चमकणारी राज्ये : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तेलंग मेमोरियल आणि मातोश्री वसतिगृहाची केली पाहणी

नव्या दिल्लीत स्थापना दिवसालाच काँग्रेसचा झेंडा खाली पडला..? सोनिया गांधीही बघत राहिल्या..

vishwatmaklokswamivarta

आंबेडकरी चळवळीचे लोकशाहीर दिवंगत प्रभाकर पोखरीकर यांचे मुंबईत स्मारक उभारणार ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

vishwatmaklokswamivarta

मतदान शांततेत पार पडावे म्हणून जिल्ह्यात मनाई आदेश-7 फेब्रुवारीला मतदान, 9 फेब्रुवारीला मतमोजणी…

vishwatmaklokswamivarta

हिंद- दी- चादर’ श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी नवी मुंबई येथे