vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अलिबाग शहराला वाढीव पाणीपुरवठा करणारी योजना- मंत्री उदय सामंत

अलिबाग शहराला वाढीव पाणीपुरवठा करणारी योजना- मंत्री उदय सामंत

 

 

 

            मुंबई, प्रतिनिधी: अलिबाग शहराचे वाढते नागरीकरण लक्षात घेता अलिबाग नगरपरिषदेमार्फत नगरोत्थान महाभियानांतर्गत वाढीव पाणीपुरवठा योजना तसेच अस्तित्वातील जलवाहिनीचे नूतनीकरण अशा रुपये ४९ कोटी ११ लाख रूपयांच्या कामांना लवकरच सुरूवात करून हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.

 

अलिबाग शहरात काही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. अलिबागमध्ये टँकरने पाणीपुरवठा बंद होवून अलिबाग नगरपरिषदेकडून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याबाबत प्रश्न सदस्य विक्रम काळे यांनी उपस्थित केला होता.

 

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, अलिबाग येथील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. नगरपरिषदेमार्फत नगरोत्थान महाभियानांतर्गत वाढीव पाणीपुरवठा योजना तसेच अस्तित्वातील जलवाहिनीच्या नूतनीकरणासाठी ४९ कोटी ११ लाख रुपयांच्या कामांना मान्यता मिळाली आहे. या कामाला लवकरच सुरूवात होणार आहे.

 

००००

 

संध्या गरवारे/विसंअ/

संबंधित पोस्ट

मत्स्यव्यवसाय विभागाच्या व्हीजन डॉक्युमेंट 2047 मध्ये सर्वसमावेशकता असावी- मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे,वातावरण बदलामुळे होणाऱ्या परिणामांवर  उपाययोजनांचा प्रामुख्याने समावेश असावा

विधानसभा प्रश्नोत्तर :-थॅलेसेमिया मुक्तीसाठी राज्यात जनजागृतीपर विशेष कार्यक्रम- आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta

उत्तराखंडमध्ये ढगफुटी; दोघांचा मृत्यू, 5 जण बेपत्ता

गोव्यातील नामांकित रेस्टॉरंटमध्ये परदेशी युवतीवर लैंगिक अत्याचार, दोघांना अटक

vishwatmaklokswamivarta

आपत्ती काळातील मदतीसाठी प्राधिकरणाची तयारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून पूरग्रस्त व दरडप्रवण गावांना स्ट्रेचर, लाईफ जॅकेटचे वाटप

vishwatmaklokswamivarta

निष्काम भावनेतून मदत करणारा कर्मचारी हेमंत सपकाळ