vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अलिबाग शहराला वाढीव पाणीपुरवठा करणारी योजना- मंत्री उदय सामंत

अलिबाग शहराला वाढीव पाणीपुरवठा करणारी योजना- मंत्री उदय सामंत

 

 

 

            मुंबई, प्रतिनिधी: अलिबाग शहराचे वाढते नागरीकरण लक्षात घेता अलिबाग नगरपरिषदेमार्फत नगरोत्थान महाभियानांतर्गत वाढीव पाणीपुरवठा योजना तसेच अस्तित्वातील जलवाहिनीचे नूतनीकरण अशा रुपये ४९ कोटी ११ लाख रूपयांच्या कामांना लवकरच सुरूवात करून हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.

 

अलिबाग शहरात काही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. अलिबागमध्ये टँकरने पाणीपुरवठा बंद होवून अलिबाग नगरपरिषदेकडून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याबाबत प्रश्न सदस्य विक्रम काळे यांनी उपस्थित केला होता.

 

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, अलिबाग येथील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. नगरपरिषदेमार्फत नगरोत्थान महाभियानांतर्गत वाढीव पाणीपुरवठा योजना तसेच अस्तित्वातील जलवाहिनीच्या नूतनीकरणासाठी ४९ कोटी ११ लाख रुपयांच्या कामांना मान्यता मिळाली आहे. या कामाला लवकरच सुरूवात होणार आहे.

 

००००

 

संध्या गरवारे/विसंअ/

संबंधित पोस्ट

🌞🌹आज चे पंचांग 🌹🌝

नागपूर येथील राजभवनावर आयोजित कार्यक्रमात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी राज्य मंत्रिमंडळाचे सदस्य म्हणून ३३ मंत्री आणि ६ राज्यमंत्री यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

vishwatmaklokswamivarta

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रीछगन भुजबळ यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशातील चार शेतकऱ्यांना पद्म पुरस्कार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त*

रायगड जिल्ह्यातील पांढऱ्या कांद्याचे क्षेत्र १ हजार हेक्टर करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील — जिल्हाधिकारी किशन जावळे

vishwatmaklokswamivarta