vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

सफाई कर्मचाऱ्यांना लाड पागे समितीच्या शिफारशी लागू करण्यास शासन सकारात्मक – राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

सफाई कर्मचाऱ्यांना लाड पागे समितीच्या शिफारशी लागू करण्यास शासन सकारात्मक – राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

 

 

 

            मुंबई, प्रतिनिधी : सफाई कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावून त्यांची उन्नती साधण्यासाठी लाड पागे समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या शिफारशीनुसार सफाई कर्मचाऱ्यांना लाभ देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. समितीने दिलेल्या शिफारशी लागू करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज सांगितले.

 

मंत्रालयातील समिती कक्षात अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या मागण्यांच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या बैठकीस अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष प्रताप निवाले, संघटनेचे गोविंद परमार, राजेश रेवते, नगर परिषद प्रशासन संचालनालयाचे उपायुक्त रोहिदास दोरकुळकर, नागपूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अ.रा. चारणकर, मुंबई महापालिकेचे उपायुक्त (घनकचरा) सं. सु कबरे, सहायक कामगार आयुक्त श्री. शिंदे, सामाजिक न्याय विभागाचे उपसचिव रवींद्र गोरवे आदी उपस्थित होते.

 

सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन संवेदनशील असल्याचे सांगत मंत्री श्री. देसाई म्हणाले की, सफाई कर्मचाऱ्यांना आश्रय योजनेतंर्गत घरकुले देण्यासाठी महानगरपालिका आयुक्त व नगर पालिका मुख्याधिकारी यांनी शासकीय जमिनीचा शोध घ्यावा. जमिनीचा प्रस्ताव महसूल विभागाकडे देऊन अशा जमिनींवर सफाई कर्मचाऱ्यांसाठी घरकुले बांधण्यात यावीत. सध्या मुंबई महापालिका घरकुले बांधत आहेत. ही घरकुले सेवाज्येष्ठतेनुसार सफाई कर्मचाऱ्यांना वितरीत करावी. तसेच मोठ्या मल:निस्सारण वाहिनीमध्ये अजूनही मानवी हस्तक्षेपाने कामे करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. ही कामेही यांत्रिकीकरणाने करण्याबाबत स्वतंत्र धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

 

००००

 

निलेश तायडे/विसंअ

संबंधित पोस्ट

मुंबईत 25 वर्षीय नौदलाच्या खलाशाने केली आत्महत्या, कुलाबा पोलीस तपास करत आहेत

vishwatmaklokswamivarta

नव्या मुंबईत ऐरोलीतील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारकात हजारो नागरिकांची महामानवाला अभिवादन…

♦️२००६ बॉम्बस्फोट प्रकरण : राज्य सरकार सुप्रीम कोर्टात करणार आव्हान.

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई येथील थ्री आर सेंटर्समधील कपडे संकलन मोहीम तसेच ई – वेस्ट संकलन मोहीम नागरिकांच्या उत्तम प्रतिसादाने यशस्वी

vishwatmaklokswamivarta

एसटी महामंडळाचा उपक्रम;-प्रवाश्यांच्या समस्या निराकरणासाठी प्रत्येक बुधवारी “प्रवासी राजा दिन” व “कामगार पालक दिन

सांगलीच्या स्मृती सदैव स्मरणात राहतील- मावळते जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

vishwatmaklokswamivarta