vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

प्रधानमंत्री उज्वला योजना व मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत वार्षिक ३ गॅस सिलेंडरचे पुनर्भरण (Reffill) मोफत योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांनी बँक खाती आधार संलग्न करणे व गॅस एजन्सी डिस्ट्रीब्युटर्सशी संपर्क साधून ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक

प्रधानमंत्री उज्वला योजना व मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत वार्षिक ३ गॅस सिलेंडरचे पुनर्भरण (Reffill) मोफत योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांनी बँक खाती आधार संलग्न करणे व गॅस एजन्सी डिस्ट्रीब्युटर्सशी संपर्क साधून ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक

 

 

ठाणे, प्रतिनिधी) : अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्या क्र. घगॅस-२०२४/प्र.क्र.५८/नापु-२७. दि.३० जुलै २०२४ च्या शासन निर्णयान्वये केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे ५२.१६ लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक ३ गॅस सिलेंडरचे पुनर्भरण (Reffill) मोफत उपलब्ध करून द्यावयाचे आहेत. या योजनेचा लाभ हा थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) व्दारे होणार आहे.

 

या योजनेचा लाभ घेण्याकरिता सर्व लाभार्थ्यांनी त्यांची बँक खाती आधारसंलग्न करणे तसेच उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनी त्यांच्या गॅस एजन्सी डिस्ट्रीब्युटर्स यांच्याशी संपर्क साधून ई-केवायसी पूर्ण करून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून या योजनेचा लाभ घेणे लाभार्थ्यांना सुलभ होईल, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. विकास गजरे यांनी केले आहे.

 

0000000000

संबंधित पोस्ट

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीच्या शासनातर्फे करण्यात येणा-या पूर्वतयारीचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला आढावा

त्या’ बालकांच्या पालकांनी संपर्क करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील धारावी येथे पहाटेच्या सुमारास एका गोदामाला भीषण आग लागल्याची घटना..6 जण गंभीर जखमी रुग्णालयात उपचार सुरू

लातूर ग्रामीण भागातील मंडप, पेंडॉल तपासणीसाठी पथके गठीत*

धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची झाली स्थापना…

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद ठाणे-डॉ. समीर तोडणकर यांच्या हस्ते सेवानिवृत्त होणाऱ्या २३ कर्मचाऱ्यांचा सन्मान

vishwatmaklokswamivarta