vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

बुलडाणा डाक विभागाचा उत्कृष्ट कार्यासाठी गौरव

बुलडाणा डाक विभागाचा उत्कृष्ट कार्यासाठी गौरव

 

बुलडाणा, प्रतिनिधी : डाक विभागामार्फत विविध योजनांसाठी आणि राबविण्यात आलेल्या मोहिमांसाठी मुख्य पोस्टमास्तर जनरल यांच्या हस्ते बुलडाणा डाक विभागाचा उत्कृष्ट कार्यासाठी गौरविण्यात आला.

 

मुंबई येथे आयोजित सत्कार सोहळ्यात राज्यातील सर्व विभाग, जिल्हा प्रमुख, डाक निदेशक, क्षेत्रिय पोस्टमास्तर जनरल उपस्थित होते. बुलडाणा डाक विभागाने केलेल्या प्रयत्नांसाठी दोन पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यात बुलडाणा डाक विभागाला आर्थिक वर्ष 2023-24 साठी 90 हजार निव्वळ खात्यांचे उद्दिष्ट देण्यात आले. यात विभागाने एकूण 77 हजार 742 खाती जोडलीत. यात बुलडाणा नागपूर क्षेत्रांतर्गत पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच दि. २९ जानेवारी ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत संपूर्ण राज्यात राबविण्यात आलेल्या ‘नया साल, नया जोश’ मोहिमेत बुलडाणा विभागाने 49 हजार 795 खाते जोडली, यात बुलडाणा विभाग राज्यात तिसरे स्थानी आहे.

 

बुलडाणा डाक विभागाने वर्षभरात आर्थिक समावेशन कार्यक्रमांतर्गत घेतलेल्या प्रयत्नांसाठी विभागास मुख्य पोस्टमास्तर जनरल यांच्या हस्ते गौरविण्यात आले. बुलडाणा डाक विभागामार्फत डाक अधीक्षक गणेश आंभोरे यांनी सन्मान चिन्ह स्विकारले.

संबंधित पोस्ट

अकोला येथे  नायलॉनच्या मांज्यामुळे आईसोबत दुचाकी वर जाणार्‍या साडेतीन वर्षीय मुलाचा चिरला गेला गळा

विधानसभेत नगर विकास, पाणी पुरवठा व गृहनिर्माण विभागाच्या पुरवणी मागण्या मान्य

vishwatmaklokswamivarta

जालना येथील शेतकऱ्यांना मिळाले यंदा विक्रमी उत्पादन‘श्रीराम सुपर ५- एसआर-५ ’ बियाणांमुळे शेतपिकात उल्लेखनीय बदल

vishwatmaklokswamivarta

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 :आपलं मत….आपली ताकद …स्वीप उपक्रमांतर्गत मतदार जनजागृती

vishwatmaklokswamivarta

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या मुख्य कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

देऊळगाव राजा तालुक्यातील 48 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत 9 जुलैला