vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे येथे ‘एक पेड माँ के नाम’ अभियानाचा शुभारंभ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे येथे ‘एक पेड माँ के नाम’ अभियानाचा शुभारंभ…

 

राज्य प्रतिनिधी

राज्यातील सर्व महापालिकांनी त्यांच्या क्षेत्रात एक लाख झाडे लावावीत, असे निर्देश दिले असून त्याप्रमाणे सर्व महापालिका वृक्षारोपण करीत आहेत. पर्यावरणाचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने वृक्षारोपण करणे, ही भविष्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे येथे ‘एक पेड माँ के नाम’ अभियानाच्या शुभारंभप्रसंगी केले.

 

‘एक पेड माँ के नाम’ या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन प्रत्येकाने आपल्या आईच्या नावे एक झाड लावावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नागरिकांना केले.

 

ठाणे महानगरपालिका, महाराष्ट्र वन विभाग, ग्रीन यात्रा आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मुख्यमंत्री हरित ठाणे एक लक्ष वृक्ष लागवड’ या अभियानांतर्गत ‘एक पेड माँ के नाम’ या अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, लोकमान्य नगर येथे वृक्षारोपण करून करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

महापालिका आयुक्त सौरभ राव, खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त शंकर पाटोळे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे उपसंचालक उदय ढगे, वरिष्ठ उद्यान अधीक्षक केदार पाटील, ज्येष्ठ माजी नगरसेवक हणमंत जगदाळे, एकनाथ भोईर, दिगंबर ठाकूर, विहंग सरनाईक, माजी नगरसेविका राधाबाई जाधवर, आशा डोंगरे, वनिता घोगरे, प्राजक्ता खाडे, वृक्ष प्राधिकरण समितीच्या माजी सदस्य नम्रता भोसले तसेच ग्रीन यात्राचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

 

राज्यातील सर्व महापालिकांनी वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेतला असून आतापर्यंत ठाणे महापालिकेने सर्वाधिक म्हणजे ६१ हजार झाडे लावल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आयुक्त सौरभ राव यांचे विशेष अभिनंदन केले.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण राज्यात जाहीर केलेल्या “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” या योजनेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या योजनेचे दोन हप्ते महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली असून महिलांसाठी ही योजना सुरू केल्याबद्दल लोकमान्य नगरमधील महिलांनी मुख्यमंत्र्यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला

 

संबंधित पोस्ट

जनगणना प्रक्रिया समजावून घेण्यासाठीप्रशिक्षण महत्त्वाचे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

एसटी महामंडळातील दोषी अधिकाऱ्याला तातडीने बडतर्फ करणार— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक• स्पष्ट, कायदेशीर स्पीकिंग ऑर्डर देत बडतर्फ करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

अकोला जिल्ह्यात गौण खनिजाची अवैध वाहतूक झाल्याची माहिती प्राप्त झाल्यास पुन्हा चौकशी- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्प- व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचतील – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे  

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र हादरला! वाळू माफियांकडून तहसीलदाराला जेसीबीच्या सहाय्याने चिरडण्याचा प्रयत्न…