vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

१५ वर्षात न सुटलेला रस्त्याचा प्रश्न दोन दिवसात मार्गी  घाटगे पाटलांनी स्वखर्चातून तयार केला निपाणी पिंपळगावच्या शेतरस्ता  

१५ वर्षात न सुटलेला रस्त्याचा प्रश्न दोन दिवसात मार्गी  घाटगे पाटलांनी स्वखर्चातून तयार केला निपाणी पिंपळगावच्या शेतरस्ता

———

घनसावंगी: प्रतिनिधी  तालुक्यातील निपाणी पिंपळगाव येथील शेतकरी १५ वर्षांपासून शेत रस्त्याअभावी त्रस्त होते. दोन दिवसापूर्वी त्यांनी सतीश घाटगे यांची भेटू घेऊन आपला प्रश्न मांडला. या शेतकऱ्यांचा प्रश्न दोन दिवसात घाटगे पाटलांनी मार्गी लावला असून समृद्धी कारखान्यांमार्फत स्वखर्चातून हा रस्ता तयार करून दिला आहे.

 

निपाणी पिंपळगाव येथील शेतकऱ्यांना अरुंद रस्त्याअभावी शेती करता येत नव्हती. हा रस्ता झाल्यास आमची जीवनवहिनी सुरू होईल, अशी माफक अपेक्षा त्यांनी सतीश घाटगे यांच्याकडे व्यक्त केली होती. 15 वर्षात होऊ न शकलेले हे काम दोन दिवसात घाटगे पाटील यांनी मार्गी लावले. त्यामुळे शेतकरी आनंदी झाले. त्यांनी आनंद व्यक्त करत सतीश घाटगे यांचे आभार मानले. समृद्धी कारखाण्यामार्फत स्वखर्चातून तयार झालेला हा रस्ता भविष्यात खडीकरण करून मजबूत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सतीश घाटगे यांनी सांगितले. या रस्त्यासाठी स्थानिक कार्यकर्ते भाऊसाहेब ढेंबरे आणि माऊली ढेंबरे यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. यावेळी विठ्ठल गोल्ड,रावसाहेब बिरणावळे,अर्जुन बिरणावळे,भाऊसाहेब बिरणावळे,अशोक बिरनावळे,आकाश बिरणावळे, सुदाम बिरणावळे,सचिन बिरणावळे,अमोल गव्हाणे,नामदेव गव्हाणे उपस्थित होते

संबंधित पोस्ट

बाळापूर तालुक्यातील वीटभट्ट्यांची प्रदूषणाच्या दृष्टीने फेरतपासणी- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करा = अबू आजमी समाजवादी पार्टी नेते

नागरी संरक्षण दलामार्फत टिटवाळा (पूर्व) येथे मॉक ड्रीलचे आयोजन

कौशल्य, रोजगार, उद्योजकता, नाविन्यता मंत्रीमंगलप्रभात लोढा यांचा जिल्हा दौरा..

रा. सू. गवई स्मारक उद्घाटनासाठी सज्ज*अमरावतीत उभे राहिले भव्य स्मारक*जिल्हाधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा

vishwatmaklokswamivarta

मुंबईकरांना पाणीटंचाई – दिवाळीच्या अभ्यंग स्नानाच्या दिवशीच मुंबईकरांना पाणी टंचाई …

vishwatmaklokswamivarta