vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठीअर्ज करण्याचे आवाहन

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठीअर्ज करण्याचे आवाहन

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी:- अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी सन २०२४-२५ या सत्रातील अर्ज महाडीबीटी संकेतस्थळावर तात्काळ सादर करण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चेतना मोरे यांनी केले आहे.

 

आदिवासी विकास विभागाकडून राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपुर्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत असलेल्या छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड व लातुर जिल्हयातील सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विना अनुदानित महाविद्यालयांना भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क प्रतिपुर्ती योजना व इतर योजनेचे शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी mahadbt.maharashtra.gov.in प्रणाली कार्यान्वीत झाली आहे.

 

छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड व लातुर जिल्हयातील विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी सन २०२४-२५ या सत्रातील (fresh) नविन तथा (Renewal) नुतनीकरण अर्ज महाडीबीटी पोर्टलवर तात्काळ सादर करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी श्रीमती मोरे यांनी केले आहे.

 

*****

संबंधित पोस्ट

निवडणूक निरीक्षक राजेंद्र कटारा यांच्याकडून ईव्हीएम मशीन तयारीच्या प्रक्रियेची पाहणी..

vishwatmaklokswamivarta

दोन महिला चालवतात फरलव्ह पेट रिसॉर्ट व डॉग ट्रेनिंग सेंटर

दहीहंडी’द्वारे गोविंदा पथकांचा भारतीय सैन्य दलाच्या शौर्याला सलाम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई शहर व उपनगरातील विविध दहीहंडी कार्यक्रमांना भेट देऊन नागरिकांना शुभेच्छा

संजय गांधी निराधार योजनेचे अर्थसहाय्य डीबीटीव्दारे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार* आधार लिंक करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

राज्यमंडळाने “त्या” निर्णयात केला मोठा बदलआंदोलनाचा धसका घेत अखेर मागणी मान्य,विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे धरणे आंदोलन स्थगित..

vishwatmaklokswamivarta

ज्येष्ठांची काळजी घेणारी“मुख्यमंत्री वयोश्री योजना”