vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

बॉलीवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाची प्रदर्शन पुन्हा लांबणीवर.

बॉलीवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाची प्रदर्शन पुन्हा लांबणीवर.

 

बॉलीवूड प्रतिनिधी

बॉलीवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना राणावत यांचा बहुचर्चित असणारा इमर्जन्सी चित्रपट पुन्हा लांबणीवर पडला आहे नुकताच हा चित्रपट प्रदर्शित होणार होता परंतु काही कारणांवर पूर्ण लांबणीवर गेला आहे या चित्रपटात अभिनेता अनुपम खेर, श्रेयस तळपदे, मिलिंद सोमण, विशाक नायर, बॉलीवूड अभिनेत्री महिमा चौधरी आणि दिवंगत अभिनेते सतीश कौशिक हेही इमर्जन्सीमध्ये दिसणार आहेत. मात्र, सध्या प्रेक्षकांना चित्रपटाच्या नव्या प्रदर्शनाच्या तारखेची वाट पाहावी लागणार आहे.

 

बॉलीवूड अभिनेत्री आणि खासदार अभिनेत्री कंगना रणौत सध्या ‘इमर्जन्सी’  चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. विविध प्लॅटफॉर्मवर चित्रपटाचे ती प्रमोशन करत आहे. चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत असलेला श्रेयस तळपदे आणि कंगना गेल्या आठवड्यात ‘इमर्जन्सी’च्या प्रमोशनसाठी ‘बिग बॉस मराठी’च्या घरी गेले होते. एकीकडे कंगनाचे जोरदार प्रमोशन सुरू असतानाच, या चित्रपटाबद्दल वाद वाढत चालले आहेत. सध्या सुरू असलेल्या वादांमुळे कंगनाचा ()हा आगामी चित्रपट ‘इमर्जन्सी’ नियोजित 6 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार नाही. चित्रपटाची रीलिजची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे

याशिवाय कंगनाने स्वतः ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. कंगनाचा हा आगामी चित्रपट 6 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज होता. परंतु प्रचंड वादाच्या पार्श्वभूमीवर, आता तो पुन्हा लांबणीवर पडला असून त्याची तारीख नुकतेच ठरवण्यात येणार आहे असल्याचे बॉलिवूड सूत्रांकडून कळते

संबंधित पोस्ट

लघुपट हे सामजिक भावना, विचार मांडण्याचे प्रभावी माध्यम- दिग्दर्शक व्याचेस्लाव गुज ,कनेक्टिंग क्रिएटर्स, कनेक्टिंग कंट्रीज’ चर्चासत्र

बुलडाणेकरांना स्वरविहार च्या कार्यक्रमाची सांस्कृतिक मेजवानी ..व्हाॅईस ऑफ मीडिया आणि बुलडाणा अर्बन चा संयुक्त उपक्रम …हास्यजत्रा फेम गौरव मोरे आणि वनिता खरात खास आकर्षण

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी दिली पुणे येथील राष्ट्रीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्था (एफटीआयआय) आणि राष्ट्रीय  (एन एफ ए आय–एन एफ डी सी) ला भेट

vishwatmaklokswamivarta

छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, त्याग अन् प्रखर राष्ट्र व धर्म निष्ठा लोकांपर्यंत पोहोचूया!‘छावा’ चित्रपटाला करमुक्त करण्याची हिंदु जनजागृती समितीची सरकारकडे मागणी !

vishwatmaklokswamivarta

विमल दिवस निमित्ताने मुंबई विद्यापीठ कलिना परिसरात विविध कार्यक्रम-राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर लिखित रश्मिरथी नाटकाचा प्रयोगअर्चना शंभरकर याच्या हिंदी पुस्तकाचे होणार लोकार्पण…

६१ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्रवेशिका उपलब्ध-२८ ऑक्टोबरपर्यंत प्रवेशिका सादर करता येणार वेळेत प्रस्ताव सादर करण्याचे व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांचे आवाहन