*राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण” व नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “विधी सेवा महशिबिर”
नवी मुंबई प्रतिनिधी
“राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण” व नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “विधी सेवा महशिबिर” कार्यक्रमाचे आयोजन राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय , आंबेडकर नगर रबाळे याठिकाणी करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय न्यायमूर्ती श्रीमती गौरी गोडसे (उच्च न्यायालय मुंबई), मा.न्यायमूर्ती श्रीनिवास अग्रवाल (प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ठाणे), मा.श्री.अशोक शिनगारे (जिल्हाधिकारी ठाणे), मा.श्री.कैलास शिंदे (आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका) यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आले.