vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अपघातग्रस्त उसतोड कामगार कुटुंबाला सतीश घाटगेनी दिला आधार-बाणेगावातील शिंदे परिवाराला समृद्धीकडून आर्थिक मदत

अपघातग्रस्त उसतोड कामगार कुटुंबाला सतीश घाटगेनी दिला आधार-बाणेगावातील शिंदे परिवाराला समृद्धीकडून आर्थिक मदत

 

घनसावंगी : प्रतिनिधी

बैलपोळा सणाच्या दिवशी बैलजोडी धूत असताना पाय घसरून बानेगाव येथील ऊसतोड कामगार शिवाजी शिंदे (वय ४८ ) यांचे गोदावरी नदीत अपघाती निधन झाले. त्यामुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा आधार हरवला. शिवाजी शिंदे यांच्या कुटुंबाला समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी आधार दिला आहे. शिंदे परिवाराची सांत्वन भेटू त्यांनी आर्थिक मदत केली असून त्यांच्याबासोबत प्रत्येक अडचणीत मदत करण्याचा शब्द सतीश घाटगे यांनी दिला आहे.

 

 

 

घनसावंगी तालुक्यातील बानेगाव येथील शिवाजी शिंदे व त्यांचा परिवार ऊसतोडी करतात. त्याचं कुटुंब दरवर्षी ऊसतोडी करून उदरनिर्वाह करत. ऊस तोडीसाठी घेतलेल्या बैलांना बैलपोळा सणानिमित्त गोदावरी नदीकाठी धूत असताना त्यांचा पाय घसरून गोदावरी नदीत तोल गेला. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण बाणेगावावर शोककळा पसरली. सर्व गावातील व्यक्तींनी हळहळ व्यक्त केली. याची माहिती गावकऱ्यांनी सतीश घाटगे यांना दिल्यानंतर या दुःखदायी परिस्थितीत शिंदे कुटुंबाला धीर देण्यासाठी सतीश घाटगे यांनी बाणेगावात जाऊन शिंदे परिवाराचे सांत्वन करून धीर दिला. तसेच त्यांना आर्थिक मदतही केली. तसेच येणाऱ्या काळातही मदतीची गरज लागल्यास संपर्क करण्याचे शिंदे कुटुंबातील सदस्यांना सांगितले. यावेळी गावकरी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

शेगाव येथे होणाऱ्या राष्ट्रीय महाआरोग्य मेळाव्याचे राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांना निमंत्रण

vishwatmaklokswamivarta

पुढील २४ तासांसाठी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाट भागात रेड अलर्ट

शाळांमध्ये पायाभुत सोयी-सुविधा पुरविणे अनुदान योजनेसाठी-इच्छुक शाळांनी योजनेसाठी प्रस्ताव सादर करावेत

vishwatmaklokswamivarta

मतदार जागरूकतेच्या स्वीप कार्यक्रमाची नवी मुंबईत प्रभावी अंमलबजावणी

vishwatmaklokswamivarta

पाण्याची आवर्तने देताना कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घ्या-जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

vishwatmaklokswamivarta

विशेष वृत्त :विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी ‘महावाचन उत्सव’

vishwatmaklokswamivarta